मानखुर्द रेल्वे स्थानकावर हमालाचा संशयास्पद मृत्यू

 Mankhurd
मानखुर्द रेल्वे स्थानकावर हमालाचा संशयास्पद मृत्यू

मानखुर्द - एका हमालाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. गणेश साहू (48) असे त्या व्यक्तीचं नाव असून तो कळवा येथील रहिवासी आहे. सकाळी सातच्या सुमारास तो बेशुद्धावस्थेत असल्याचे आढळल्यानंतर तिथल्या काही प्रवाशांनी याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना दिली. त्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडील कागदपत्रावरून त्याची ओळख पटली असून लोकलमधून पडून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

Loading Comments