पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी डमी उमेदवार, नवा घोटाळा उघड

Charni Road
पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी डमी उमेदवार, नवा घोटाळा उघड
पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी डमी उमेदवार, नवा घोटाळा उघड
See all
मुंबई  -  

पोलीस भरतीत झालेल्या घोटाळ्यानतंर आता लेखी परीक्षेदरम्यान एक नवीन घोटाळा समोर आला आहे. व्ही. पी. रोड परिसरात बुधवारी पोलीस भरतीची लेखी परिक्षा सुरू असताना एका परिक्षार्थीने आपल्या जागी डमी परीक्षार्थीला बसवल्याची घ़टना समोर येताच, एकच खळबळ उडाली आहे. डमी परिक्षार्थीला व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सागण्यात आले आहे.

चर्नी रोड परिसरातल्या सेंट टेरेसा हायस्कुलमध्ये बुधवारी पोलीस भरतीची परीक्षा सुरू होती. तेव्हा ही बाब पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या लक्षात आली असता त्यांनी डमी परिक्षार्थी सज्जन मोतिलाल सत्तवाना याची तपासणी करण्यास सुरुवात केली. तो चिखलठाण्याचा असून परीक्षा दिल्यानतंर चुळबुळ करू लागल्याने पोलिसांच्या लक्षात आले. सज्जनला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो भरती उमेदवाराच्या जागी आला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

सज्जनविरोधात व्ही. पी. रोड पोलिसांनी कलम 419, 465, 120 (ब ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस भरतीच्या शारिरीक चाचणीच्या वेळीही अशा घटना समोर आल्या होत्या. आपली उंची वाढावी यासाठी काही उमेदवारांनी चपलांना नाणी चिटकवली होती. या घटनेनंतर आता लेखी परीक्षेतही अशा प्रकारचा घोटाळा सेमोर आल्याचे दिसत आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.