चोरट्यांनी लुटलेल्या मौल्यवान वस्तू नागरिकांना सुपूर्द


चोरट्यांनी लुटलेल्या मौल्यवान वस्तू नागरिकांना सुपूर्द
SHARES

घरफोडी, जबरी चोरी आणि दरोडा यात चोरीला गेलेले नागरिकांचे दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी 63 तक्रारदारांना सुपूर्द केले आहे. एकूण दोन कोटी 15 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला आहे.


तक्रारदारांनी मानले पोलिसांचे आभार

दक्षिण परिमंडळाच्या पोलिसांनी एक-दोन नव्हे तर सुमारे 63 तक्रारदारांचे मुद्देमाल शनिवारी त्यांना सुपूर्त केले. यातीलच एक तक्रारदार मनीष जैन यांना 95 टक्‍क्‍यांहून अधिक मुद्देमाल परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

जैन यांचे व्ही. पी. रोड पोलिसांच्या हद्दीतील दुकानातून त्यांच्याच येथे काम करणाऱ्या नोकराने सुमारे दोन कोटींचे सोने चोरले होते. सात वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणानंतर जैन यांना शनिवारी पोलिसांनी सुमारे 65 लाखांचा मुद्देमाल परत केला. 


तक्रारदारांना त्यांचे दागिने परत

सीएसटीएम येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या कॉन्वोकेशन हॉलमध्ये शनिवारी हा कार्यक्रम पार पडला. दक्षिण प्रादेशिक परिमंडळातील गेल्या 10 वर्षांत दाखल गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानंतर तक्रारदारांना परत करण्यात आला. यापूर्वी गुन्हे शाखेकडूनही चोरीतील काही मुद्देमाल परत करण्यात आला होता, असंही यावेळी जैन यांनी सांगितलं. 

यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) प्रवीण पडवळ, उपायुक्त(परिमंडळ-1) मनोजकुमार शर्मा, उपायुक्त(परिमंडळ-2) ज्ञानेश्‍वर चव्हाण, उपायुक्त (बंदरे) रश्‍मी करंदीकर यांची उपस्थिती होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा