कोरोनाच्या भीतीमुळे पॉक्सो गुन्ह्यातील आरोपी वृद्धची सुटका


कोरोनाच्या भीतीमुळे पॉक्सो गुन्ह्यातील आरोपी वृद्धची सुटका
SHARES
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या 62 वर्षीय वृद्ध आरोपीला सत्र न्यायालयाने जामिन दिला आहे. कोरोना संसर्गाची लागण होण्याची भीती वृद्ध व्यक्तींना अधिक असल्याची बाब आरोपीच्या वकिलांनी मांडली होती.  10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी त्याला अटक केली होती.

आरोपी हा वरिष्ठ नागरीक आहे. या काळात तो कारागृहात राहिल्यास त्याला कोरोना लागण होण्याची भीती अधिक आहे, तसेच कारागृहातील गर्दीमुळे त्यांना इतर आजारही होण्याची शक्यता अधिक असल्याचा युक्तीवाद आरोपीचे वकील सुनील पांडे यांनी केला. त्यावेळी उपस्थीत करण्यात आलेले मुद्द्यांमुळे न्यायालयाचे समाधान झाल्यामुळे न्यायलयाने सोमवारी आरोपीला जामिन दिला. 15 हजार रुपयांच्या पीआर बाँडवर हा जामीन देण्यात आला. आरोपीला इतर आजारही असल्यामुळे त्याला कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचे पांडे यांनी सांगितले.

आरोपीने 22 फेब्रुवारीला 10 वर्षीय मुलीला मंदिराजवळ थांबवून तिचा विनभंग केला होता. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन हा सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर कफ परेड पोलिसांनी याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भादंवि कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. याप्रकरणी पुढे आरोपीची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली होती. अल्पवयीन मुलांविरोधातील लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना एवढ्या लवकर जामीन मिळत नाही.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा