कोरोनाबाधित आरोपी रुग्णालयातून पळाला, मुंबईतील धक्कादायक घटना

तो कोविड वार्ड असल्याने तेथे सुरक्षा रक्षकांना ठेवण्याची परवानगी नव्हती. म्हणून आरोपीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन शिपायांना रुग्णालयाच्या खाली गस्तीला ठेवले होते.

कोरोनाबाधित आरोपी रुग्णालयातून पळाला, मुंबईतील धक्कादायक घटना
SHARES

मुंबईच्या जीटी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू असलेला आरोपी पळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा आरोपी सराईत नसला, तरी कोरोना बाधित असल्याने तो इतरांच्या संपर्कात आल्यास त्यांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचाः- आता अ‍ॅमेझॉनवरुन बुक करता येणार गॅस सिलेंडर

भायखळा परिसरात रहात असलेला आरोपी छोटू लालमन वर्मा(२५) याला काही दिवसांपूर्वी भायखळा पोलिसांनी एनडीपीएस म्हणजेच ड्रग्जचे सेवन अथवा स्वत:जवळ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. तुरूंगात असताना तो कोरोना बाधिताच्या संपर्कात आला. त्यामुळे त्याच्यातही कोरोना संदर्भातील लक्षणे ४ नोव्हेंबर रोजी आढळून आली. त्यामुळेच त्याला उपचारासाठी तातडीने आझाद मैदान परिसरातील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल केले. वर्माला रुग्णालयातील ज्या वार्डमध्ये ठेवण्यात आले होते.  तो कोविड वार्ड असल्याने तेथे सुरक्षा रक्षकांना ठेवण्याची परवानगी नव्हती. म्हणून आरोपीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन शिपायांना रुग्णालयाच्या खाली गस्तीला ठेवले होते.

हेही वाचाः- पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल, भाजपावर गंभीर आरोप

मात्र रुग्णालयाच्या कोविड वार्डाबाहेर सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून वर्मा याने गुरूवारी पहाटे रुग्णालयातून पळ काढला. आरोपी रुग्ण   पळाल्याचे कळताच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार आझाद मैदान पोलिस ठाण्यात कमल २२४, १८८,२६९ भा.द.वी कमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी हा कोरोना बाधित असल्यामुळे तो इतरांच्या संपर्कात  आल्यास त्यांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळेच पोलिसांची पथक मुंबईत या आरोपीचा शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा