पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल, भाजपावर गंभीर आरोप

या पार्श्वभूमीवर व्हिडिओबाबत गोवा फॉरवर्ड पक्षानं संताप व्यक्त केला आहे. सोबतच भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल, भाजपावर गंभीर आरोप
SHARES

लग्नानंतर काही दिवसांतच पतीवर गंभीर आरोप करणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनमवर गोव्यात अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप आहे. तिच्याविरूद्ध गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम व्यतिरिक्त तिचा व्हिडिओ शूट करणार्‍या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवा फॉरवर्ड महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. "आधीच गोव्याला पार्टी डेस्टिनेशन आणि ड्रग्ज डेस्टिनेशन म्हटलं जातं. आता या राज्याची ओळख पॉर्न डेस्टिनेशन करायची आहे का?" अशा शब्दात त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षानं अश्लिल व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी पूनम पांडे विरोधात पोलिस तक्रार केली आहे. गोव्यात पूनमनं काणकोण इथल्या चापोली धरणावर एक मादक व्हिडिओ शूट केला.

हे धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. या पार्श्वभूमीवर व्हिडिओबाबत गोवा फॉरवर्ड पक्षानं संताप व्यक्त केला आहे. भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का? असा सवाल करत त्यांनी पूनमवर जोरदार टीका केली.

पूनम गोव्यात हनीमूनसाठी गेली होती. त्याचवेळी तिनं हा व्हिडिओ शूट केल्याचं सांगितलं जातंय. गोव्यातच हनीमूनच्या वेळी पती सॅम बॉम्बेनं आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप पूनमनं केला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर पोलिसांनी सॅमला ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर पूनम आणि सॅम बॉम्बे यांनी सामंजस्यानं हा वाद मिटवला होता.



हेही वाचा

मेहंदी चित्रपटातील अभिनेता फराज खानचं निधन

विनयभंगाच्या आरोपानंतर कौवा बिर्यानी फेम विजय राजची चित्रपटातून हकालपट्टी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा