धक्कादायक! तब्बल 43 कामगार कोंबून उत्तरप्रदेशला निघालेला ट्रक पोलिसांनी पकडला


धक्कादायक! तब्बल 43 कामगार कोंबून उत्तरप्रदेशला निघालेला ट्रक पोलिसांनी पकडला
SHARES
लॉकडाऊनमुळे सर्व ठिकाणी प्रवासी वाहतूक बंद असताना  शहरातील 43कामगारांना ट्रकमधून उत्तर प्रदेश येथे घेऊन जाताना,  रफी अहमद किडवाई पोलिस ठाण्याच्या पोलिसंानी ट्रक पकडला. या प्रकरणी पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेत, ट्रकचे चालक आणि मालकावर गुन्हा नोंदवलेला आहे.


मुंबईत कोरोनाचे थैमान पाहता सरकारने सर्वञ लाँकडाऊन केले आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूकीला खिळ बसली असून शहरात हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी प्रशासनाने अटी आणि शर्तीवर व्यवस्था केली आहे. माञ त्या आधारावर वेळ आणि मेहनत वाया जात असून निष्पन्न काही होत नसल्यामुळे ट्रकमधून जाण्याकडेच कामगारांची कल जास्त असल्याचे आर ए रिडवाई पोलिसांनी केल्या कारवाईतून पुढे आले आहे.

आर ए किडवाई पोलिसांना नाकाबंदी  दरम्यान एक ट्रक अडवला. तपासणीत त्यात 43 कामगार अक्षरशहा कोंबून भरलेले होते. पोलिसांची नजर चुकवून या कामगारांनी त्याच्या मूळ गावी नेहले जात होते. त्यासाठी प्रत्येकाकडून अडीच ते तीन हजार ट्रक चालकाने स्विकारले होते. पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेत, मोहम्मद याकुब अली (41) यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने ट्रकचा मालक मोहम्मद जलील (45) याच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची कबूली दिली. त्यानुसार पोलिसांनी चालकाला नोटीस बजावून मालका विरोधात लाँकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस ट्रक मालकाचा शोध घेत आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा