काय सांगता ! चोराच्याच घरात चोरांनी केली चोरी

त्याच्या घरातून दोन लाख ५० हजारांची रोख व दोन लाखांचे सोने असे एकूण साडे चार लाखांची मालमत्ता चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

काय सांगता ! चोराच्याच घरात चोरांनी केली चोरी
SHARES

चोराच्या घरी चोरी झाली असे कधी ऐकले आहे का? नाही ना. कारण चोराच्या घरी सहसा चोरी होत नाही, पण कधी कधी चोराला पण असा अनुभव येतोच की राव! काही घटना अशा घडतात की तुम्हाला कर्मावर विश्वास बसायला लागतो. मुंबईत ही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. कुर्ल्याच्या नेहरू नगर परिसरात चोरीच्या गुन्ह्यात एकाला पोलिसांनी अटक केली. त्या आरोपीला कोरोना झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला व त्याच्या कुटुंबियांना तातडीने क्वरनंटाइन सेंटरमध्ये हलवले. मग काय चोरानी मोकळं घर पाहुण त्या चोराच्याच घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  

हेही वाचाः- कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा

कुर्लाच्या नेहरूनगर पोलिसांनी एक दुकान लुटी प्रकरणात सात  जणांना अटक केली होती. त्यातील पाच चोरांना कोरोना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ही क्वारनटाइंन व्हावे लागले. मानवतेच्या दृष्टीकोनातून न्यायालयाने या सर्वांना जामिन दिला. त्या सर्वांना तातडीने क्वारनटाईन करण्यात आले. तसेच त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना ही विलगीकरण कक्षात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यातील एक चोर हा चेंबूरच्या मालेकरवाडीत रहावयास होता. पोलिसांनी तातडीने त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना या घटनेची माहिती देत, त्यांना देवनार येथील विलगीकरण कक्षात हलवले. त्यामुळे घरात कोणीच उपस्थित नव्हते.

हेही वाचाः- मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

याच संधीचा इतर चोरांनी फायदा घेत त्या चोराच्याच घरी लूट केली. दोन दिवसांपूर्वी शेजा-यांनी दूरध्वनी करून घरात चोरी झाल्याचे सांगितले आणि चोराच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानुसार परवानगी घेऊन याप्रकरणी चोराने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्याच्या घरातून दोन लाख ५० हजारांची रोख व दोन लाखांचे सोने असे एकूण साडे चार लाखांची मालमत्ता चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा