४८ तासात ६६ पोलिसांची कोरोनावर मात

महाराष्ट्र पोलिस दलातील १९५ अधिकारी व १२३६ पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित पोलिसांमध्ये कोरोनाचे अतिसौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्या पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

४८ तासात ६६ पोलिसांची कोरोनावर मात
SHARES

तीन महिने कोरोनाचा वैशाख वणवा सोसल्यानंतर या विचित्र परिस्थितीचे अनेक पोलिस शिकार झाले. राज्यातील १ हजार ४३१ पोलिस हे सध्या कोरोनाने त्रस्त असले तरी आंनदाची बाब म्हणजे मागच्या ४८ तासात पोलिस दलात एक ही कोरोनाने संक्रमित पोलिस सापडलेला नाही. विशेष म्हणजे मागील ४८ तासात ६६ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याचे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ठ होते. तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या महामारीने आतापर्यंत ३४ जणांचा बळी घेतला आहे.

हेही वाचा :-  महापालिका रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सज्ज

राज्यात १ हजार ४३१ पोलिसांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील हजारो पोलिसांना सध्या क्वारंटाइन करून ठेवले आहे. या महामारीने ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढला आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने पोलिसांची डोकेदुखी ही वाढली आहे. या ना त्या कारणाने पोलिसांच्या समस्या वाढतच असून संपण्याचे नाव घेत नव्हत्या, त्यामुळेच पोलिसांच्या या समस्या जाणून त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठीच पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 'व्हिडीओ कॉन्फरसिंग'द्वारे आज्ञांकित कक्ष सुरु करण्यात आले आहे.

हेही वाचा :-दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिलं हे उत्तर

महाराष्ट्र पोलिस दलातील १९५  अधिकारी व १२३६  पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित पोलिसांमध्ये कोरोनाचे अतिसौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्या पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोना बाधित पोलिसांच्या आकडेवारीत कमालीची वाढ होत होती. माञ सध्या त्यात कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसात हाताच्या बोटावर मोजण्या इथपर्यंत संख्या वाढली होती. मात्र मुंबई पोलिस आयुक्तालयात आता ७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजते.  राज्याच्या आकडेवारीत ही कोरोना झालेल्यांमध्ये मुंबई पोलिसांची संख्या ही लक्षणिय आहे. मुंबई पोलिस दलात र्सोमवारी सायंकाळपर्यंत १०३५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर या पूर्वी नोंदवण्यात आलेल्या रुग्णांमधील ८१३ रुग्ण हे पूर्णतहा बरे झालेले आहेत. मागील २४ तासात पोलिस खात्यात फक्त एकाच पोलिसाला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा