Advertisement

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिलं हे उत्तर

निकालाची तारीख अद्याप ठरलेली नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी कुठल्याही तारखांवर विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल, असं आवाहन शकुंतला काळे यांनी केलं.

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिलं हे उत्तर
SHARES

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) आणि उच्च माध्यमिक शिक्षण (HSC) मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षांच्या निकालाच्या तारखा (coronavirus live updates maharashtra education board clarifies over ssc and hsc results) व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांनाही हे निकाल कधी लागणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यावर शिक्षण मंडळातर्फे खुलासा करण्यात आला आहे. 

निकालाकडे लक्ष

दरवर्षी अंदाजे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर होतात. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ८ जून, तर बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. परंतु लाॅकडाऊनमुळे यावर्षीचे निकाल चांगलेच रखडले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ३ मार्च ते २३ मार्च २०२० या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली हाेती. परीक्षा अंतिम टप्प्यात आलेली असतानाच कोरोनामुळे दहावीच्या सामाजिक शास्त्र पेपर-२ (भूगोल) आणि दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर पेपर घ्यायचा की थेट गुण द्यायचे, गुण द्यायचे झाल्यास कशा पद्धतीने द्यायचे, असा प्रश्न मंडळाला सतावत होता. अखेर या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने पर्याय शोधत अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचं रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येईल, असं नक्की केलं. 

हेही वाचा - अखेर ठरलं! दहावी भूगोलच्या पेपरला मिळणार ‘इतके’ गुण

अफवांवर विश्वास नको

भूगोल विषयाचा प्रश्न निकाली निघाल्याने गुणपत्रिका कधी हाती येणार, अशी उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. परंतु अद्याप दहावी-बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचं संकलन आणि निकाल तयार करण्याचं काम सुरू असल्याचं राज्य मंडळाच्या अध्यक्षा डाॅ. शकुंतला काळे यांनी स्पष्ट केलं. सोबतच निकालाची तारीख अद्याप ठरलेली नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी कुठल्याही तारखांवर विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल, असं आवाहन देखील शकुंतला काळे यांनी केलं.

यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेला १३ लाख विद्यार्थी बसले होते, तर सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.   

हेही वाचा - परीक्षा रद्द करणं अशक्य, CBSE-CISCE बोर्डाने मांडली सरकारपुढं स्पष्ट भूमिका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा