कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांच्या हेल्पलाईनवर जीवानश्यक वस्तूंसाठी 589 दूरध्वनी

करोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांच्या हेल्पलाईनवर जीवानश्यक वस्तूंसाठी 589 दूरध्वनी
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात 21 दिवस लॉक डाऊन करण्याचे आदेश आहेत. त्यानंतर काही ठिकाणी नागरीकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमिवर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कोरोनाची माहिती, जीनावश्यक वस्तूंबाबत चौकशी करणारे 589 दूरध्वनी आले होते.
सध्या करोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती असून अनेल लोक दुकानं तसंच सुपर मार्केटमध्ये गर्दी करत असून सामान खरेदी करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे. त्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नका असं आवाहन केले होते. पण तरीही नागरीक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी घरातून बाहेर पडताना मंगळवारी दिसले.  दिवसभरात मुंबई पोलिसांच्या  नियंत्रण कक्षाला10 हजार 283 दूरध्वनी आले. त्यातील 589 दूरध्वनी कोरोनाची माहिती, सॅनेटायजर व जीवनावश्यक वस्तूं होते. 
याशिवाय जीवनावश्यक वस्तूंखेरीज उघड्या दुकांनाबाबतही दूरध्वनी आले.तसेच आमच्या इमारतीत परदेशातून आलेले व्यक्ती राहत आहेत, कोरोना संशयीत रस्त्यावर फिरत असल्याचे दूरध्वनीही पोलिसांना प्राप्त झाले. 
शहरात 112 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विलीगीकरण करण्यात आलेल्या तिघांवर, हॉटेल आस्थापना बाबत16, पान टपरी 6, इतर दुकाने53, फेरीवाले 18, सार्वजनिक ठिकाणी गर्दी 10 आणि अवैध वाहतुक संदर्भात 6 गुन्ह्यांचा समावेश आहे. हे सहा कार चालक गरज नसताना तसेच अत्यावश्यक सेवांची वाहने चालू ठेवण्याचा आदेश असतानाही आपल्या गाड्या घेऊन घरात बाहेर पडले होते. त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली होती. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा