मुंबई पोलिस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

राज्यातील १००१ पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असून त्यात ११८ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबई पोलिस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून अत्यावश्य सेवा बजावणाऱ्या अनेक कर्मचारी या माहामारीपासून वाचू शकलेले नाही. दुर्दैवाने या महामारीने रविवारी आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. राज्यातील १००१ पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असून त्यात ११८ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  तर या महामारीने आतापर्यंत ४७ पोलिसांचा जीव घेतलेला आहे. मृत पोलिसांमध्ये मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या ३२ इतकी आहे.

हेही वाचाः-  कोरोनावर आली गोळी १०३ रुपयांच्या गोळीचं मुंबईत उत्पादन सुरू

विशेष शाखेत हवालदार लेखनिक असलेले ५७ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याला ३ जून रोजी कोरोनाची लागण झालेली होती. त्याच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू असताना, ४ जून रोजी त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे.  पोलिस आयुक्तालय वसाहतीत ते मागील अनेक वर्षांपासून वास्तव्याला होते. मुंबईत आतापर्यंत २३९५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १६६७ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या पोलिसांचा आकडे ६५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यातील ७२२ जण कर्तव्यावर पुन्हा रूजू झाले आहे. २८२ पोलिस उपचारानंतर सध्या घरी आहेत, तर ६६३ पोलिस लवकरच कर्तव्यावर रूजू होणार आहेत.   मुंबईत पोलिसांसाठी चार कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचाः- Reduce height of ganesh idols: यंदा गणेशमूर्ती लहानच ठेवा, मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना आवाहन

या कोविड केअर सेंटरमध्ये ४५२ पोलिस  उपचार घेत आहेत. तर २०५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय ३५ पोलिसांना विलगीकरणार ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर प्रतिबंधात्मक साहित्य व औषधांचे वाटपही पोलिसांना करण्यात आले आहे. याशिवाय मुंबईत कार्यरत ८२ राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनाही आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. पाच अधिकारी व ७७ जवानांचा समावेश आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा