Advertisement

Reduce height of ganesh idols: यंदा गणेशमूर्ती लहानच ठेवा, मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना आवाहन

कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मूर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. उत्सव मंडपही लहान असावेत, , असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

Reduce height of ganesh idols: यंदा गणेशमूर्ती लहानच ठेवा, मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना आवाहन
SHARES

कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मूर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार (maharashtra cm uddhav thackeray urges ganeshotsav mandals in mumbai to reduce the height of ganesh idols ) करावा. उत्सव मंडपही लहान असावेत. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेऊनच गणेशोत्सव साजरा व्हावा. गणेशोत्सव साजरा करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाययोजना या अंगानेन प्रत्येक गोष्टींचं नियोजन करावं, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना केलं.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अजय चौधरी, मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी तसंच विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- यंदाचा गणेशोत्सव लाॅकडाऊनच्या चौकटीतच

मूर्तींच्या उंचीबाबत शासनाने  मार्गदर्शक सूचना दिल्यास, त्यांचं पालन केलं जाईल. कोरोना विषाणू आणि आरोग्यविषयक आणि स्वच्छतेबाबत शासनस्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केलं जाईल, अशी भूमिका मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी मूर्तीची उंची, उत्सवाचे स्वरूप यांसह पारंपारिक विसर्जन मार्ग आणि गणेश विसर्जन व्यवस्था या अनुषंगानेही चर्चा झाली. तसंच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करू. आरोग्य शिबारे, विषाणू प्रादुर्भावाबाबत जनजागृती तसंच वैद्यकीय सेवा-सुविधा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रमांचं नियोजन करू, अशी भूमिकाही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईतील गणेश मंडळांची समाजाभिमुख उपक्रमात योगदान देण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात मुंबईतील गणेशोत्सव मंडळं आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य मेळावे, शिबिरे आदी उपक्रमांद्वारे यावर्षीही हिरिरीने पुढे राहतील, असा विश्वास आहे. 

कोरोना विषाणूचं सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मूर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टींचे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या अंगाने नियोजन करावं. उत्सव मंडपही लहान असावेत. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याचं नियोजनही याठिकाणी करावं लागेल. विषाणूचं संकट टळल्यानंतर, पुढच्या वर्षी हाच गणेशोत्सव गतवर्षीच्या उत्सवाच्या कितीतरी पट उत्साहाने साजरा करता येईल. हा विश्वास बाळगून यंदाचा उत्सव साजरा करूया, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा