Advertisement

यंदाचा गणेशोत्सव लाॅकडाऊनच्या चौकटीतच

कोरोना संकट आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बहुतेक गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचंच दिसून येत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिलं.

यंदाचा गणेशोत्सव लाॅकडाऊनच्या चौकटीतच
SHARES

मुंबईची विशेष ओळख जपणारा, सर्वांना हवाहवासा वाटणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या परीने उत्सव साजरा करण्याची तयारीही सुरू केली आहे. तरीही कोरोना संकट आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बहुतेक गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचंच दिसून येत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत गुरूवार १८ जून रोजी संवाद साधत (maharashtra cm uddhav thackeray meets ganesh festival mandals delegation ahead of ganeshotsav) त्यांना प्रोत्साहन दिलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी गणेशोत्सवातील कायदा, सुव्यवस्था संदर्भात व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

हेही वाचा - प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट, ‘या’ निर्णयावर सर्वांचे एकमत

अतिशय साधेपणाने

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करताना आपण प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत आहोत. नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. त्यामुळे गर्दी करता येणार नाही, मिरवणुका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. त्यामुळे चौकटीत राहूनच साधेपणाने उत्सव साजरा करावा लागेल. ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण सर्व मिळून घेऊ, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ते पुढं म्हणाले, सामाजिक भान ठेवून संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू. गणेश मंडळांमार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा विचार करून कार्यक्रम निश्चित करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

मंडळांचं सहकार्य

तसंच पुणे तसंच राज्यातील इतर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करचा निर्णय घेतलेला आहे. सरकारने लागू केलेल्या प्रत्येक नियमांचं पालन करण्याचं आश्वासन गणेश मंडळांनी दिलं आहे. शिर्डी, सिद्धिविनायक व अन्य संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मोठी मदत केली आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.

हेही वाचा - कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा