'या' हेड कॉन्स्टेबलचे गृहमंञ्याकडून कौतुक, कोरोनाच्या लढ्यासाठी दिला संपूर्ण पगार


'या' हेड कॉन्स्टेबलचे गृहमंञ्याकडून कौतुक, कोरोनाच्या लढ्यासाठी दिला संपूर्ण पगार
SHARES
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसचा प्राधुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कोरोना संसर्ग नागरिकांची संख्या आता 338 वर जाऊन पोहचली. देशभरातील सर्व रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत. दुसरीकडे कोरोनाशी दोन हात करताना आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून मोठ मोठे उदयोगपती, अभिनेते मदतीचा हात पुढे करत आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईचे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी 10 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री रिलिफ फंडसाठी केल्याने त्याचे सर्वञ कौतुक होत आहे.

मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू साहेब डांगरे यांनी 10 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे. तर कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी आपले योगदान दिले आहे. तसेच बापू डांगरे यांनी या रक्कमेचा चेक महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. त्याचसोबत शिर्डी संस्थानने 51 कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या वेतनपोटी 11 कोटी रुपये, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरने एक कोटी रुपये दिले आहेत.

तर महाराष्ट्रात 3 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. दरम्यान, बुलढाण्यात एक तर, पुणे येथे 2 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 338 वर पोहचली आहे. वरळीत दोन पोलिस शिपायांना कोरोनाची लागन झाली आहे. तर लालबागमध्ये एक नवीन रुग्ण समोर आल्याने संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला आहे. लागन झालेल्या शिपायांसह त्यांच्या कुटुंबियांसह उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा