महाराष्ट्र पोलिस दलात ३५१ नवे रुग्ण, तर ३ जणांचा २४ तासात मृत्यू

राज्यात ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलातील मृतांचा आकडा १४२ वर पोहोचला आहे

महाराष्ट्र पोलिस दलात ३५१ नवे रुग्ण, तर ३ जणांचा २४ तासात मृत्यू
SHARES

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी नियंत्रणात येत असला, तरी तो संसर्ग जन रोग असल्यामुळे पसरण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या पोलिसांना या संसर्ग जन्य रोगाचा सर्वाधिक फटका पडल्याचे पहायला मिळत आहे.  मागील २४ तासांत राज्यातील ३५१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच दिवसात कोरोनाग्रस्त झालेल्या पोलिसांचा हा उच्चांक आहे. याशिवाय राज्यात ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलातील मृतांचा आकडा १४२ वर पोहोचला आहे. 

हेही वाचाः- कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात तब्‍बल ५७.७६ टक्‍के वाढ

गेल्या २४ तासांत राज्यात ३५१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलातील आतापर्यंत कोरोनाबाधीत झालेल्या पोलिसांचा आकडा १४ हजार०६७ वर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यातील १४२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात १५ अधिका-यांचा समावेश आहे. सध्या राज्य पोलिस दलात दोन हजार ५६९ कोरोनाबाधीत सक्रीय रुग्ण आहेत. राज्य पोलिस दलातील ११ हजार ३५६ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून त्यातील बहुसंख्य पोलिस पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत चार हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

हेही वाचाः- लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर

याशिवाय गेल्या २४ तासांत तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक  शहर पोलिस दलातील ५५ वर्षीय सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय अहमदनगर पोलिस दलातील एका हवालदाराचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा