राज्यात १८९८ पोलिस कोरोना बाधित, ९८ जणांचा आतापर्यंत मृत्यू

राज्यात तब्बल ८ हजार ९५८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ६ हजार ९६२ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर ९८ पोलिसांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

राज्यात १८९८ पोलिस कोरोना बाधित, ९८ जणांचा आतापर्यंत मृत्यू
SHARES

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवस-रात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी झटत असताना. या अत्यावश्यक सेवा करणाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषता पोलिसांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक दिसून आहे. राज्यात तब्बल ८ हजार ९५८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ६ हजार ९६२ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर ९८ पोलिसांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेला आहे. या परिस्थितीतमुळे पोलिसांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहेत.

हेही वाचाः- कोरोना पाॅझिटिव्ह परदेशी नागरिक गेला पळून, पोलिस लागले कामाला

सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात एरव्हीची कामं पाहून लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं, अतिसंक्रमित क्षेत्रात बंदोबस्त करणं, दुकानं बंद आहेत की नाहीत हे पाहणं अशी कामं पोलिसांना करावी लागत आहेत. विलगीकरण केंद्र, कोरोना उपचार केंद्रावरही पोलिसांची नियुक्त असते. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांच्या अपेक्षित संख्येत आधीच कमतरता असताना आता आणखी कामं करावी लागत असल्यानं पोलिसांवर शारीरिक आणि मानसिक ताण आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणं, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणं, गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोचवणं ही पोलिसांची खरी कामं; परंतु आता या कामांच्या बरोबरीने अतिमहत्त्वाच्या व्यक्तंीचा बंदोबस्त, त्यांना सुरक्षा, रस्त्यावर वाहतुकीचं नियोजन, धार्मिक स्थळी बंदोबस्त, अपघातस्थळी धावून जाणं, आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाणं अशी नानाविध कामं करावी लागतात. यामुळे पोलिसांची कार्यक्षमता कमी होत असून त्यांच्या कामाचं मूल्यमापनही चुकीच्या पध्दतीने केलं जात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

हेही वाचाः- लाॅकडाऊनमुळे झाला खायचा वांदा म्हणून पत्करला चोरीचा धंदा

अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवरील ताण दिवसेंदिवस वाढला आहे. सध्या पोलिस खात्यात ५० वर्षावरील नागरिकांना कोरोनामुळे कामावर येण्यास मनाई केली आहे. तर कोरोनामुळे शेकडो पोलिस आज क्वारन्टाइन आहेत. त्यामुळे पोलिसांवरील जबाबदारी ही आणखी वाढलेली आहे. अशात नागरिकांनी हीसहकार्य करणे गरजेते असते. मात्र अनेकदा नागरिकांकडूनच पोलिसांवर हल्ले होत असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी आतापर्यंत ३२२ जणांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. तर लाॅकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी २ लाख १४ हजार ५९४ गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे कोरोनावर जरी नियंत्रण मिळवण्यात आलेअसले. तरी धोका अद्याप टळलेला नसल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा