लाॅकडाऊनमुळे झाला खायचा वांदा म्हणून पत्करला चोरीचा धंदा

लाॅकडाऊनमुळे काम सुटल्यामुळे अनेकांचे जेवणाचे वांदे झाले आहेत. त्यामुळे कामगारांनी चोरीचा मार्ग पत्कारल्याचे आझाद मैदान पोलिस ठाण्यात उघडकीस आलेल्या एका चोरीच्या घटनेतून पुढे आले आहे.

लाॅकडाऊनमुळे झाला खायचा वांदा म्हणून पत्करला चोरीचा धंदा
SHARES

मुंबईसह देशावर ओढावलेल्या कोरोना या महामारीने अनेक जण त्रस्त आहेत. परिस्थितीच्या काळात नियती काय करायला लावेल याचा काही नेम नाही. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांच्या हातचे काम सुटले आहेत. काम सुटल्यामुळे अनेकांचे जेवणाचे वांदे झाले आहेत. त्यामुळे कामगारांनी चोरीचा मार्ग पत्कारल्याचे आझाद मैदान पोलिस ठाण्यात उघडकीस आलेल्या एका चोरीच्या घटनेतून पुढे आले आहे.

हेही वाचाः- महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल उद्या होणार जाहीर

मुंबईच्या सीएसटी परिसरातील प्रसिद्ध कॅनन या पावभाजी सेंटर दुकानात काही दिवसांपूर्वी १०० किलो बटर आणि चीज चोरीला गेल्याची तक्रार आझाद मैदान पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अखेर संतोष थापा(२०) व करण जाधव(२५) या दोघांना अटक केली आहे. लॉकडाऊनमुळे हातचे काम सुटले जेवणाचे वांदे असल्यामुळे या दोघांनी ही चोरी केल्याची कबूली या दोघांनी पोलिसांना दिली आहे. महापालिका मुख्यलयासमोर असलेले कॅनन पावभाजी केंद्रावर ऐरवी पावभाजी खाणाऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळते. मागील ४८ वर्षांपासून पी.एन. दांडेकर हे केंद्र चालवतात. दुकान फोडल्याचे कळाल्यानंतर दांडेकरांनी पाहणी करून याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांकडे तक्रार केली होती.

हेही वाचाः- Electricity Bill: अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

चोरट्यांनी केंद्राचे ग्रील्स तोडून गाळ्यात प्रवेश केला होता. अनेक दिवसांचे भूकेले असलेल्या चोरांना केंद्रात पैसे मिळाले नाही. शहरात केव्हाही अनलाँकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्यामुळे दांडेकरांनी केंद्रात १०० किलो बटर आणि चीज हे भरले होते. त्यामुळे चोरट्यांना केंद्रात काहीच न मिळाल्याने त्यांनी दुकानातील १०० किलो बटर आणि चीज हे चोरून पळ काढला. एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याचे दांडेकरांनी तक्रारीत म्हटले आहे. या परिसरात सीसीटिव्हीचे मोठे जाळे आहे. त्याच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता. चोरांनी चोरीसाठी एक टॅम्पो आणून ही चोरी केल्याचे सीसीटिव्हीत स्पष्ठ दिसत आहे. त्या टॅम्पोवरील नंबरच्या मदतीने पोलिसांनी आरोपी संतोष थापा(२०) व करण जाधव(२५) यांच्यापर्यंत पोहचले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना रविवारी अटक केली. हे दोघेही फुटपाथवर राहणारे असून भंगार गोळा करतात. त्यांनी चोरीचा काही माल विकला व उतरलेले चीज, बटर खाल्ल्याचे चौकशीत सांगितले. या चोरीत सहभागी असलेल्या तिसऱ्या आरोपीचा ही पोलिस शोध घेत आहेत. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा