शिक्षकांनीच फोडला पेपर ?, आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रेखा कला परीक्षेची प्रश्नपत्रिका चेंबूरच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी फोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

शिक्षकांनीच फोडला पेपर ?, आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
SHARES

महाराष्ट्रात पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून सातत्याने  प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र तरी ही प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार घडत आहेत. विद्यार्थ्यांकडून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभाग पावलं उचलत असताना शिक्षकांकडूनच प्रश्नपत्रिका फोडल्या जात असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे.  राज्य सरकारच्या कला संचालनालयाच्या वतीने सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या रेखा कला परीक्षेची प्रश्नपत्रिका चेंबूरच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी फोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पेपर परीक्षेआधीच फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.  याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात आता तक्रार नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचाः- मुंबईत पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाचा अंदाज

कला संचालनालयाच्या वतीने २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१९ या कालावधीत रेखा कला परीक्षेचे (एलिमेंट्री ग्रेड व इंटरमिजीऐड ग्रेड) आयोजन करण्यात आले होते. त्यात आॅब्जेक्ट ड्राॅइंग, मेमरी ड्राॅइंग डिझाइन, प्लेन जाॅमेट्री अॅण्डलेटरिंग, स्टिल लाइफ मेमरी ड्राॅइंग, डिझाइन, जाॅमेट्री साॅलीज, जाॅमेट्री अँण्ड लेटरिंग या आठ विषयांवर परीक्षा घेतली जाणार होती. या प्रश्नपत्रिका छापून त्या जे.जे. कला महाविद्यालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ठरलेल्या तारखेनुसार म्हणजेत २३ आणि २४ सप्टेंबरला या प्रश्न पत्रिका परीक्षाकेंद्रामध्ये पोहचवण्यात आल्या होत्या, दरम्यान प्रश्नपत्रिकेचे वितरण केले जात असताना. मोबाइलवर व्हाॅट्स अॅपच्या माध्यमातून या प्रश्न पत्रिका वायरल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संचालकांनी तात्काळ बैठक बोलवून परीक्षा स्थगित केली.

हेही वाचाः- ऑगस्टमध्ये उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार - अस्लम शेख

या पेपर फुटी प्रकरणी विभागीय चौकशी बसवण्यात आली. त्यावेळी सर्व परीक्षा केंद्रातून पश्न पत्रिकांचे गठ्ठे मागवण्यात आले. त्यावेळी चेंबूरच्या स्वामी विवेकानंद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामधून आलेल्या २२ गठ्यांपैकी आठ गठ्यांच्या सीलसोबत छेडछाड झाल्याचे निदर्शनास आले. या प्रश्नपत्रिकांच्या संचाची माहिती अमित पोरे आणि गंगाधर सावंत या शिक्षकांवर देण्यात आली होती. त्यानुसार दोघांवर आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी परीक्षा अधिनियम, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा  आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती  आझाद मैदान पोलिस ठाण्याचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर काळकुंद्रे यांनी दिली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा