कोरोना पाॅझिटिव्ह परदेशी नागरिक गेला पळून, पोलिस लागले कामाला

कोरोना चाचण्यांबाबत पालिकेला कोणतीही माहिती तुर्क याने दिली नव्हती. तसेच अहमद पळून गेल्यानंतही त्याने त्याबाबत कोणतीही माहिती पालिकेला दिली नाही.

कोरोना पाॅझिटिव्ह परदेशी नागरिक गेला पळून, पोलिस लागले कामाला
SHARES

कोरोनामुळे संपूर्ण देशाची विमानसेवा ही मागील महिन्याभरापासून ठप्प आहे. त्यामुळे ज्या त्या देशात अनेक परदेशी नागरिक अडकून पडलेले आहेत. या परदेशी नागरिकांची कोरोना चाचणी करणे कुलाबा येथील हाॅटेल मालकाला चांगलेच अंगलट आले आहे. हाॅटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची चाचणी केल्यानंतर त्यातील एकाचा अहवाल हा पाॅझिटिव्ह आला. हीबाब त्याला कळाल्यानंतर त्या परदेशी नागरिकाने हाॅटेलमधून पळ काढला आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात या परदेशी नागरिक आणि हाॅटेल मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यता आला आहे.

  हेही वाचाः- ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम आयसीयूत, कुटुंबियांकडून मदतीचं आवाहन

कुलाबा परिसरात मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक मुंबई दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येथील हाॅटेलमध्ये परदेशी नागरिक वास्तव्यास असतात. दरम्यान अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि लाॅकडाऊन जाहिर केले. त्यात केंद्राकडून परदेशी विमानउड्डाणांवर बंदी घातल्यामुळे बहुसंख्य परदेशी नागरिक भारतात, मुंबईत अडकले. असेच काही ५९ परदेशी नागरिक हे कुलाबातील अगा बेघ या हाॅटेलला थांबले होते. बहुतांश नागरिकांकडील पैसे संपत आले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या मायदेशी परत जायचे होते. यातील बहुतांश नागरिक हे सुदानचे होते. मात्र त्यांना कोरोना चाचणीशिवाय परदेशात पाठवता येणार नाही. त्या अनुशंगाने हाॅटेलचे मालक रहिम तुर्क यांनी खासगी प्रयोगशाळेच्या मदतीने पालिकेची परवानगी अथवा पालिकेला न कळवता. त्या परदेशी नागरिकांची कोरोना चाचणीचे आयोजन केले. याची माहिती जवळच्या एका किशन हाॅटेलमध्ये थांबलेल्या अहमद हमीद अहमद अलीम याला मिळाली. त्यानुसार तो देखील तेथे कोरोना चाचणी करण्यासाठी पोहचला.

  हेही वाचाः- दिवसभरात १० हजार रुग्ण झाले बरे, ७७१७ नवे रुग्ण

त्या परदेशी नागरिकांचे अहवाल आल्यानंतर त्यातील अहमदचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. ही गोष्ट त्याला कळाल्यानंतर आता परदेशात लवकर जाता येणार नाही. त्यामुळे इथे क्वारनटाइन करून ठेवतील. या भितीने त्याने कुणालाही न सांगता हाॅटेलमधून पळ काढला. हीबाब प्रशासनाच्या कानावर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी  कोरोना चाचण्यांबाबत पालिकेला कोणतीही माहिती तुर्क याने दिली नव्हती. तसेच अहमद पळून गेल्यानंतही त्याने त्याबाबत कोणतीही माहिती पालिकेला दिली नाही. तसेच या चाचणीसाठी मोठ्याप्रमाणात परदेशी नागरीकांनी गर्दी केली होती. याबाबतची माहिती स्थानिक वैद्यकीय अधिका-यांना मिळाल्यानंतर याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात डाॅ. धर्मकुमार कोरी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आपत्ती निवारण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पळून गेलेल्या परदेशी नागरीकाचा आता शोध सुरू आहे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा