शाँक लागून कामगाराचा मृत्यू, कुलाबा रेडिओ क्लबमधील घटना


शाँक लागून कामगाराचा मृत्यू, कुलाबा रेडिओ क्लबमधील घटना
SHARES
मुंबईतल्या उच्चभ्रूवर्गीयांची कायम वरदळ असलेल्या रेडिओ क्लबमध्ये शाँक लागून एका 40 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. रामचंद्र भूवनेश्वर असे या मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात अपघाती नोंद करण्यात आली आहे.


रेडिओ क्लबमध्ये गुरूवारी सायंकाळी स्वियमिंग पूल साफ करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी रामचंद्रकडून इलेक्ट्राँनिक मशीन स्वियमिंग पूलमध्ये पडली. त्यावेळी रामचंद्र यांचा शाँक लागल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. रामचंद्र यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात नेले असता. उपचारा दरम्यान रामचंद्र यांचा मृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी घोषित केले. त्यानुसार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

त्या व्यतिरिक्त मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या ही दोन घटना समोर आल्या आहेत. विलेपार्ले येथे सुलताना शेख या 29 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. तर कांदीवलीच्या समतानगरमध्ये एका विद्यार्थ्याने घरात गळफास लावून आयुष्य संपवले. अंकित सिंग (20)असे  या तरुणाचे नाव आहे. या दोघांनी हे टोकाचे पाऊल का उचलेले याचा पोलिस शोध घेत आहेत.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा