Advertisement

कौतुकास्पद! धारावीतील 16 पोलिसांची कोरोनावर मात, पुन्हा कामावर रुजू

या पोलिस ठाण्यातील 32 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातील 31 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून ही खरचं कौतुकास्पद गोष्ठ आहे.

कौतुकास्पद! धारावीतील 16 पोलिसांची कोरोनावर मात, पुन्हा कामावर रुजू
SHARES
Advertisement
मुंबईत कोरोनाचे हाँटस्पाँट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. येथील गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढत होतेे. यातील 16 पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करून ते पून्हा सेवेत रुजू झाले आहेत. या पोलिस ठाण्यातील 32 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातील 31 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून ही खरचं कौतुकास्पद गोष्ठ आहे.

धारावी झोपडपट्टी परिसरात अनेक चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये हे पोलिस त्यांचे कर्तव्य बजावत होते. मुंबईतील सर्वाधीक कोरोनाबाधीत रुग्ण सध्या धारावी परिसरात आहेत. त्यामुळे या पोलिस ठाण्यातील 32 पोलिस कोरोना बाधीत झाले होते. त्यातील 31 जणांनी कोरोनावर मात केली आहेत. त्यात एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, 29 कर्मचा-यांचा समावेश आहे. धारावी पोलिस ठाण्यातील केवळ एक पोलिस कोरोनावर उपचार घेत असून सध्या रुग्णालयात दाखल आहे. त्यांची प्रकृतीही सुधारत आहे. बाकीच्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून काही दिवस विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे.

धारावी परिसरात रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे सुरूवातीच्या काळातच अनेक पोलिसांनाही त्याची लागण झाली. त्यामुळे धारावी पोलिसांनी जागृती व समुपदेशन देण्यास पोलिसांना सुरूवात केली. याशिवाय पोलिसांना धर्मास देण्यात आले असून त्याच्या सहाय्याने पोलिसांना नियमीत गरम पाणी प्यायला मिळते. तसेच सर्वजण घरूनच जेवण घेऊन येतात. याशिवाय पोलिसांना प्रतिबंधात्मक गोळ्या, विटामिनच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 19 मेपासून धारावी पोलिस ठाण्यात कोणताही अधिकारी अथवा कर्मचा-याला कोरोनाची लागण झाली नाही
संबंधित विषय
Advertisement