मुंबईत कोरोनाचे १६२२ नवे रुग्ण, ३४ जणांचा दिवसभरात मृत्यू

बुधवारी दिवसभरात ८३८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १९ हजार ७०२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे १६२२ नवे रुग्ण, ३४ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात बुधवारी कोरोने २९२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत बुधवारी दिवसभरात १६२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत बुधवारी दिवसभरात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-अरे बापरे ! राज्यात ४२२ जणांचा एका दिवसात कोरोनाने मृत्यू, ११ हजार ११९ नवे रुग्ण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३४ रुग्ण दगावले आहेत. तर १ आॅगस्ट रोजी ३५ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ३१ आॅगस्ट रोजी एकूण ३२ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे १६२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ४८ हजार ५६९ इतकी झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात ८३८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १९ हजार ७०२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-Exclusive : राज ठाकरेंचं 'म्हणणं खरं ठरलं, महाराष्ट्राच्या कारागृहातही परप्रांतीय कैद्यांची गर्दी

राज्यात आज १३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के आहे. आज १७ हजार ४३३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०१  हजार ७०३ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ८४ हजार नमुन्यांपैकी ८ लाख २५ हजार ७३९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२७ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ०४ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५ टक्के एवढा आहे.


आज निदान झालेले १७,४३३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१६२२ (३४), ठाणे- ३०२ (५), ठाणे मनपा-३०१ (१), नवी  मुंबई मनपा-३७१ (७), कल्याण डोंबिवली मनपा-५०८ (४), उल्हासनगर मनपा-२५ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३६, मीरा भाईंदर मनपा-२१९ (३), पालघर-२५२ (७), वसई-विरार मनपा-१७१ (८), रायगड-४५८ (१०), पनवेल मनपा-२८८ (१), नाशिक-३२७ (६), नाशिक मनपा-६३१ (१४), मालेगाव मनपा-७०, अहमदनगर-३७४ (५),अहमदनगर मनपा-२१२, धुळे-८६ (१), धुळे मनपा-११० (१), जळगाव- ७६२ (१०), जळगाव मनपा-११२ (५), नंदूरबार-१०१ (३), पुणे- ९०२ (९), पुणे मनपा-१७०६ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-१००६ (२), सोलापूर-३६२ (११), सोलापूर मनपा-६१ (२), सातारा-६८३ (६), कोल्हापूर-४०९ (१०), कोल्हापूर मनपा-१९४ (१०), सांगली-४१९ (१०), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३३४ (५), सिंधुदूर्ग-४०, रत्नागिरी-१४६ (२), औरंगाबाद-१९७,औरंगाबाद मनपा-८८ (१), जालना-१३५ (२), हिंगोली-४५ (१), परभणी-३९, परभणी मनपा-४७ (१), लातूर-२०५ (५), लातूर मनपा-११३ (२), उस्मानाबाद-१६८ (६),बीड-१३० (१), नांदेड-१८१, नांदेड मनपा-१४५ (१), अकोला-३८, अकोला मनपा-१४, अमरावती-७ (१), अमरावती मनपा-३० (२), यवतमाळ-१२० (३), बुलढाणा-७४ (१), वाशिम-४७, नागपूर-३१६ (३), नागपूर मनपा-११८४ (३५), वर्धा-६४, भंडारा-७० (१), गोंदिया-१०९ (४), चंद्रपूर-११७, चंद्रपूर मनपा-८४, गडचिरोली-३६, इतर राज्य २४ (१).

Read this story in हिंदी
संबंधित विषय