वेदनादायक! ज्येष्ठ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू...


वेदनादायक! ज्येष्ठ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू...
SHARES
कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून, राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता 1061 वर जाऊन पोहचला आहे. कोरोना या संसर्ग रोगाने आतापर्यंत नऊ पोलिसांचे बळी घेतलेले आहे. अशातच शुक्रवारी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे अकाली निधन झाले आहे. 


मुंबई पोलिस दलात मृत पोलिस कर्मचारी हे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. पोलिस दलातील 50 वर्षावरील कर्मचाऱ्यांना त्याचा जास्त धोका आहे. हे लक्षात घेऊन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी 50 वर्षावरील कर्मचाऱ्यांना ड्युटीवर न येता घरीच थांबण्याचे आदेश दिले. यांचे वय 57 असल्याने ते हाय रिस्क एज ग्रुपमध्ये मोडत होते. त्यामुळे ते मागील 15 दिवसांपासून रजेवर होते. माञ शुक्रवारी मधुकर माने यांचे निधन झाल्याचे पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून कळवले.


 नुकतेच कोरोना साथीच्या रोगाने पोलिस दलातील 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने अस्वस्थतेचे वातावरण आहे. तरी ही 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी ते तैनात आहेत. माञ मुंबई पोलिस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत दिवसेंदिवस वाढत आहे. माञ पोलिसांमध्ये कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे. लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. 


पोलिसांना विश्रांतीची गरज - उद्धव ठाकरे
 
केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे इथं भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. इथं डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना  मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचं काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल तसं केंद्र सरकारने त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढताना त्याचा उपयोग होईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा