Cops track down 44 ‘missing’ Covid patients : ‘त्या’ बेपत्ता रुग्णांना शोधण्यात यश

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णांची नावे, त्यांनी दिलेले मोबाइलनंबर आणि आधार क्रमांकच्या माध्यमातून एक लिस्ट तयार करून ती पोलिसांकडे दिलेली होती. त्यानुसार पोलिसांनी या रुग्णांचे मोबाइल ट्रेस करून तसेच खबऱ्यांच्या मदतीने बेपत्ता रुग्णांना शोधले

Cops track down 44 ‘missing’ Covid patients : ‘त्या’ बेपत्ता रुग्णांना शोधण्यात यश
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. मात्र, अशातच मालाडच्या पी वार्डातून तब्बल ६३ रुग्ण बेपत्ता झाल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली होती. पालिकेने याबाबत पोलिसांना पत्र लिहित या रुग्णांना शोधण्याबाबत विनंती केली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या बेपत्ता रुग्णांमधील ४४ रुग्णांचा  शोधले असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचाः- Coronavirus pandemic: राज्यात ३८९० नवे रुग्ण, पहा तुम्हच्या जिल्यातील रुग्णांची संख्या किती

 कोरोनाचे हाटस्पाँट बनलेल्या पी वार्डात कोरोनाची चाचणी घेताना संबंधित व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता इत्यादी गोष्टी घेतल्या जातात. काही जण याची खरी माहिती देत नाहीत. तर काही जण अर्धवट माहिती देतात. किंवा प्रयोगशाळांतील कर्मचारी अनावधानानं चुकीची माहिती भरतात. त्यामुळे त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याला सोधण्याचं आव्हान मुंबई महापालिका प्रशासनासमोर आहे. सध्या मालाडच्या पी वार्डात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात फैलावत असताना. परिसरातील ६३ कोरोना बाधित रुग्ण बेपत्ता झाल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. त्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांना पत्र लिहिले.  हे रुग्ण शोधण्याबाबत पोलिसांकडे मदत मागितली आहे. हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिलेल्या पत्त्त्यावर राहत नाहीत. तर काही स्थलांतरित झाले आहेत, तर अनेकांचे फोनही बंद असल्याचे कळते.

हेही वाचाः- Actor Govinda's car accident अभिनेता गोविंदाच्या कारचा अपघात

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णांची नावे, त्यांनी दिलेले मोबाइलनंबर आणि आधार क्रमांकच्या माध्यमातून एक लिस्ट तयार करून ती पोलिसांकडे दिलेली आहे. त्यानुसार पोलिसांनी या रुग्णांचे मोबाइल ट्रेस करून तसेच खबऱ्यांच्या मदतीने यातील ४४ रुग्णांची माहिती मिळवली आहे. यातील ४ जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच १७ जण ही कुरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असून या १७ जणांमधील दोघांचा मृत्यू झालेला आहे.  तर दिंडोशी पोलिसांनी उर्वरित १९ जणांना शोधून काढत रुग्णालयात दाखल केले आहे.  त्यात ३ आरोपींचा ही समावेश आहे.  चोरीच्या गुन्ह्यात या तिघांना अटक केल्यानंतर त्याची कोविड-१९ चाचणी केली. त्यांची टेस्ट पॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांना क्वारनटाईन करण्यात आले आहे. तर ८ जणांना यापूर्वीच रुग्णालयातून डिसचार्ज मिळाला असून ते सध्या होम क्वारनटाईन आहेत.  हे सर्व १९ जण दिंडोशी परिसरातील रहिवाशी आहेत. तर उर्वरित बेपत्ता रुग्णांचा शोध अद्याप सुरू आहे.




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा