धक्कादायक ! राज्यातील निम्मे कोरोनाबाधीत पोलिस मुंबईचे...


धक्कादायक ! राज्यातील निम्मे कोरोनाबाधीत पोलिस मुंबईचे...
SHARES

कोरोनाविरुद्ध लढण्यात डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलिस उभे आहेत. अपुरे मनुष्यबळ, कटेंन्मेंट झोन मधील बंदोबस्त, 24 तास सेवा आणि वाढणारे रुग्ण... सभोवताली परिस्थिती गंभीर असूनही मुंबई पोलिस स्वत: चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाबाधीत पोलिस रुग्णांमध्ये सर्वाधिक मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या आहे. मुंबई पोलिस दलातील 1052 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाली  असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.  


कोरोनाबाधितांच्या थेट संपर्कात आल्याने राज्यातील पोलिस दलातील 1889 पोलिसांना कोरोना झाला आहे. माञ यातील 838 पोलिसांनी आता कोरोनावर मात केली असून ते पून्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेची चर्चा सर्वञ सुरू असून त्यांचे कौतुक केले जात आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यात मुंबई पोलिस दलात 1052 सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आतापर्यंत समोर आले आहेत. तर मुंबई पोलिस दलातील 14 कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1889 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील निम्मे म्हणजेच 1052 कर्मचारी हे कोरोनाने ञस्त आहेत.   अवघ्या 24 तासात राज्यात 80 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये भितीचे वातावरण आहे. राज्यातील 1889 कोरोना बाधीत पोलिसांमध्ये 1682 कर्मचारी आणि 207 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 838 पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली आहे.

पोलिसांमधला कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे. लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येत असल्याने पोलिसांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याचे निदर्शनास आले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा