Advertisement

नागरिकांना लुबाडणाऱ्या 80 रेशनचालकांवर खटले दाखल

एप्रिल महिन्यांपासून विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आतापर्यंत 886 दुकांनांची तपासणी करण्यात आली.

नागरिकांना लुबाडणाऱ्या 80 रेशनचालकांवर खटले दाखल
SHARES
Advertisement
मुंबईसह महाराष्ट्रात आधीच नागरिक कोरोनामुळे ञस्त असताना, लाँकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच संधीचा फायदा घेऊन, काही रेशनदुकानंावर मालकाकडून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारीत वाढल्या होत्या. अशा दुकानदारांविरोधात विशेष मोहिमे अंतर्गत पोलिसांनी 80 गुन्हे दाखल केले आहेत.

राज्य सरकारच्या वतीने सध्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण शिधावाटप केंद्र व स्वस्त धान्य दुकांनांमार्फत करण्यात येत आहेत. कोरोनाच्या या संकट समयी  ग्राहकांना दुकानदाराकडून फसवले जाऊ नये, यासाठी राज्य वैध मापन विभागाकडून एप्रिल महिन्यांपासून विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आतापर्यंत 886 दुकांनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत वस्तू वजनात कमी देणे याबद्दल दोन खटले, तर इतर उल्लंघन केल्याप्रकरणी 78 असे एकूण 80 खटले दाखल करण्यात आले.

छापील किंमतीपेक्षा अधिक भावाने वस्तू विकल्याप्रकरणी मुंबईत एक खटला दाखल करण्यात आला. तसेच वैध मापन शास्त्राच्या व त्या अंतर्गत नियमावलीचे उल्लघन केल्याप्रकरणी राज्यभरात 77 खटले दाखल करण्यात आले. मुंबईत याबाबत सात खटले दाखल करण्यात आले. वैध मापन शास्त्र विभागाने केलेल्या कारवाईत सर्वाधीत म्हणजे 29 खटले नागपूरमध्ये दाखल झाले. तर औरंगाबाद विभागात मध्ये 21 खटले दाखल झाले. मुंबईतही सात खटले दाखल करण्यात आले
संबंधित विषय
Advertisement