'या' पोलिसांच्या खात्यावर प्रशंसापाञ रक्कम जमा...


'या' पोलिसांच्या खात्यावर प्रशंसापाञ रक्कम जमा...
SHARES
लॉकडाऊन तसेच कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. तर कोरोनाविरुद्ध् लढणा-या योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला असुन, राज्यात आतापर्यंत 1001 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.  एकट्या मुंबईत 307  हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पोलिसांना गृहविभागाने प्रशंसापाञ रक्कम म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केली आहे.

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचा-यांसह पोलीस अहोरात्र मेहनत घेत रस्त्यावर उभे आहेत. कोरोनाने पोलिसांनाही विळखा घालत त्यांच्या भोवती फास आवळण्यास सुरूवात केली आहे. माञ तरी ही नागरिकांच्या रक्षणासाठी पोलिस आज ही न घाबरता उभे आहेत. तर अनेक पोलिस या आजारातून बरे होऊन पून्हा ड्युटीवर हजर झाले आहेत. अशा पोलिसांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. अशा पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी एकीकडे आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरले असताना. शासनाकडून ही कोरोनाला बळी पडलेल्या आणि त्यातून पूर्णतहा बरे झालेल्या पोलिसांना विशेष आर्थिक मदत केली जात आहे. कोरोनाने मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियींना 50 लाख रुप, पोलिस फांऊडेशन तर्फे 10 लाख रुपये, तर राज्य हुतात्मा निधी तर्फे 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

तर कोरोना झालेल्या आणि त्यावर मात करून परतलेल्या पोलिसांना 10 हजार रुपये प्रशांसापाञ रक्कम म्हणून जमा केली जात आहे. आतापर्यंत गृहविभागाने 25 लाख 80 हजार रुपये कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलिसांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार प्रमाणे जमा केले असल्याची माहिती गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिली आहे.


पोलिस कुटुंबियांसाठी विशेष सुविधा

पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन पोलिस आयुक्तलयात सुरू करण्यात आली आहे. त्यावर बहुतांश पोलिस व कुटुंबियांनी रुग्णालयात भरती करण्यात येणा-या अडचणीबाबत तक्रार केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलिसासाठी सांताक्रुझ वाकोला पोलीस वसाहतीतील एक इमारत कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी जवळपास 300 बेडची व्यवस्था केली गेली आहे. याशिवाय पोलिस ठाण्याच्या पातळीवर मुंबईबाहेर राहणा-या पोलिसांची राहण्याची सुविधा करण्याबाबतही प्रक्रिया सुरू असून पोलिस ठाण्यात तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच मरोळ येथेही अशाच पद्धतीने एका इमारतीचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. तसे झाल्यात तेथेही 250 बेड्स कोरोनाबाधीत पोलिसांसाठी उपलब्ध होतील

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा