पोलिसांनी आतापर्यंत 3 लाख 56 हजार ई-पासचे केलं वाटप


पोलिसांनी आतापर्यंत 3 लाख 56 हजार ई-पासचे केलं वाटप
SHARES
लाँक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  पोलिसांकडून 3 लाख 56 हजार 232 पास  वाटण्यात आले आहे. तर नियमांचे उल्लघंन करणाऱ्या  1 लाख 7 हजार 256 गुन्हे नोंद झाले असून आतापर्यंत 20 हजार 237 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या  गुन्ह्यांसाठी 4 कोटी 10 लाख 79 हजार 494 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.


 तर कोरोना विरोधात काम करत असताना, अनेकदा पोलिस, डाँक्टर आणि अन्य अत्यावश्यस सेवांवर काहींनी हल्ले केल्याच्या घटना ठिक ठिकाणी घडत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई सुरू केली आहे.  पोलिसांवर  हल्ला केल्याच्या 229 घटना घडल्या. त्यात 803 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. त्याच बरोबर राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा 672 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. तर गरज नसताना या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1 हजार 304 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 57, 670 वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

  पोलिस कोरोना कक्ष
  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील 6, पुणे 1, सोलापूर शहर 1, नाशिक ग्रामीण 1 अशा 9 पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. 127 पोलीस अधिकारी व 1026 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा