सोशल मिडियावर अफवा, २३८ जण गजाआड

आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८३ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १७३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

सोशल मिडियावर अफवा, २३८ जण गजाआड
SHARES
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४३९  गुन्हे दाखल झाले असून २३८ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
    
राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४३९ गुन्ह्यांची (ज्यापैकी २६ N.C आहेत) नोंद २७मे २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८३ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १७३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३८ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०५ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .
 
सतर्कता बाळगावी

सध्या या लॉकडाऊनच्या काळात काही नवीन प्रकारच्या  सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. कोणत्या ही वस्तूंची ऑनलाईन  ऑर्डर करताना, बऱ्याचदा एका खोट्या संकेत स्थळावर (website ) वर तुम्हाला डायरेक्ट केले जाते व मोबाईल नंबर विचारला जातो आणि मोबाईल नंबर एंटर केल्यावर एक कॉल येतो व त्या संकेतस्थळावरील (website ) एक फॉर्म भरायला सांगितलं जातो ज्यामध्ये बँक अकॉउंटचे सर्व डिटेल्स,क्रेडिट/ डेबिट कार्ड ची सर्व माहिती विचारली जाते .त्यांनतर फोन वरील व्यक्ती आपल्या मोबाइलवर येणारा  otp कन्फर्म (confirm) करायला सांगते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो व काही वेळात ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज येतो.

सर्व नागरिकांनी अशी online खरेदी करताना सतर्कता बाळगून आपले कोणतेही बँक डिटेल्स शेअर करू नयेत व असे काही घडल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर बँकेला तात्काळ कळवून आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी ,तसेच सदर गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर (website ) पण कळवावी .

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा