कोरोनाविरुद्ध लढण्यात डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलिस उभे आहेत. अपुरे मनुष्यबळ, कटेंन्मेंट झोन मधील बंदोबस्त, 24 तास सेवा आणि वाढणारे रुग्ण... सभोवताली परिस्थिती गंभीर असूनही पोलिस स्वत: चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाबाधितांच्या थेट संपर्कात आल्याने राज्यातील पोलिस दलातील 2095 पोलिसांना कोरोना झाला आहे. माञ यातील 897 पोलिसांनी आता कोरोनावर मात केली असून ते पून्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेची चर्चा सर्वञ सुरू असून त्यांचे कौतुक केले जात आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यात मुंबई पोलिस दलात 1052 सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आतापर्यंत समोर आले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 22 जणांचा कोरोनामुळे माञ अशा परिस्थितीत ही नागरिकांच्या रक्षणासाठी मुंबई पोलिस दिवस-राञ मुंबईच्या रस्त्यांवर गस्त घालत आहे.अवघ्या 24 तासात राज्यात 131 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून 2 पोलिसांचा या महामारीने मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये भितीचे वातावरण आहे. राज्यातील 2095 कोरोना बाधीत पोलिसांमध्ये 1895 कर्मचारी आणि 236 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 897 पोलिसांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केलेली आहे. पोलिसांमधला कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे. लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येत असल्याने पोलिसांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्या राज्यातील पोलिस दलात 2095 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. माञ त्यातील 1266 पोलिस कर्मचारी हे नुसत्या मुंबई पोलिस दलातील आहे. आतापर्यत 413 जणांनी कोरोनावर मात केली असून मुंबईतील 13 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यातील 20 पोलिस कर्मचाऱ्यांचा या साथीच्या रोगाने मृत्यू झाला असताना, न डगमगता आज ही मुंबईचे पोलिस रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी गस्त घालत आहेत. कौतुकाची गोष्ठ म्हणजे कोरोनाची लागण झालेले 250 हून अधिक पोलिस कर्मचारी कोरोनावर मात करून पून्हा सेवेत रुजू झाले आहेत. या जवानांच्या हिंमतीचे करावे तितके कौतुक कमी आहे.