आत्महत्येनंतर महिलेचा रिपोर्ट आला पाँझिटिव्ह

महिलेच्या मृत्यूनंतर तिचीकोरोना चाचणी करण्यात आली असता. वैद्यकीय अहवालात या महिलेला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आत्महत्येनंतर महिलेचा रिपोर्ट आला पाँझिटिव्ह
SHARES

हुंडाबळीच्या त्रासाला कंटाळून चेंबूरमध्ये आत्महत्या केलेल्या महिलेचा कोरोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी तिच्या पती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर तिचीकोरोना चाचणी करण्यात आली असता. वैद्यकीय अहवालात या महिलेला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चेंबूर येथील गांधी मैदानाजवळील एका इमारती मृत महिला तिच्या कुटुंबियांसोबत रहात होती. २०१४ मध्ये लग्न जुळवणाऱ्या संकेत स्थळावर तिची ओळख तिच्या नवऱ्यासोबत झाली होती. तिच्या नवऱ्याचे चेंबूर परिसरात कपड्याचे दुकान असल्याचे कळते. दोघांचाही यापूर्वी घटस्फोट झाला होता. दोघांची ओळख झाल्यानंतर काही दिवस दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. २०१५ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला नवऱ्याकडून ५० लाखांचा हुंडा मागण्यात आला. पण महिलेच्या घरातून २५ लाख व दागिने मुलीला देत तिचे लग्न लावून दिले. सुरूवातीचे दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र कालांतराने खाद्य पदार्थाचे दुकान सुरू करण्यासाठी नवऱ्याने महिलेच्या घरातल्यांकडे ५० लाख आणण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या ही महिला वैद्यकीय उपचारही घेत होती. तिने याबाबत कुटुंबिय व बहिणीलाही सर्व सांगितले होते. मृ्त्यूच्या आदल्या दिवशीही या महिलेने कुटुंबियांना संदेश पाटवून प्रचंड मानसिक तणावाबाबत सांगितले होते.

याप्रकरणी महिलेच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालात तिला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यानंतर महिलेच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवालादरम्यानच या महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. या महिलेला कोणाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाली, याबाबत माहिती मिळाली नसल्याचे एका अधिका-याने सांगितले. महिलेचा अंतिम शवविच्छेदन अहवाल प्रलंबीत असून त्यात महिलेला मारहाण झाली होती का, याबाबतची माहिती स्पष्ट होईल. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणतीही अटक झाली नसल्याचे अधिका-याने सांगितले
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा