लाॅकडाऊनच्या काळात ७५ हजार वाहने पोलिसांनी केली जप्त

अवैध वाहतूक करणाऱ्या १३२३ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७५ हजार ८१३वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

लाॅकडाऊनच्या काळात  ७५ हजार वाहने पोलिसांनी केली जप्त
SHARES
राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १६ हजार गुन्ह्यांची नोंद झाली.५ कोटी ७५ लाख रुपये दंड आकारणी व ७५ हजार वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते २७ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार १ लाख १६ हजार ६७० गुन्हे नोंद झाले असून २३,३१४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ७५लाख ३० हजार २६७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
    
नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई
 
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.  या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २५४ घटना घडल्या. त्यात ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
   
मदतीसाठी ९६ हजार फोन
     पोलीस विभागाचा  १०० त्रनंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लाँकडाऊन च्या काळात या फोनवर  ९६,६९७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७०६ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.  या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२३ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७५ हजार ८१३वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

पोलिसांसाठी विशेष कोरोना कक्ष

  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   राज्यातील २१पोलीस व १ अधिकारी अशा २२ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. 
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा