नगरसेविकेच्या पतीची पोलिसांना धक्काबुक्की


नगरसेविकेच्या पतीची पोलिसांना धक्काबुक्की
SHARES

कार्यकर्त्यांमधील वाद सोडवताना समाजवादी पक्षाच्या नगरसेविका साहिरा आजमी यांच्या पतीने पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी नगरसेविकेच्या पतीसह दोन जणांना अटक केली आहे.

गोवंडी शिवाजीनगर मधील प्रभाग क्रमांक 134 मधील समाजवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गुरुवारी शिवाजीनगरमध्ये चर्चेसाठी एकत्र आले होते. त्यावेळी त्यांच्यात अंतर्गत वाद झाला. या वादानंतर दोन्ही गट एकमेकांविरोधात तक्रार करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री साडे नऊच्या सुमारास आले. तेव्हा कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक प्रकाश इंगळे यांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले. मात्र कोणीही ऐकण्यास तयार नसल्याने पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले. याच दरम्यान काही कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत वाद देखील झाला. याचवेळी वॉर्ड क्रमांक 134 च्या नगरसेविका साहिरा आजमींचे पती फहाद आजमी हे देखील या ठिकाणी होते. पोलिस कार्यकर्त्यांना बाहेर काढत असताना इंगळे यांना फहाद आजमी यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ नागरसेविकेच्या पतीसह आणखी एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा