ठाण्यातून 14 लाखांची अवैध देशी दारू जप्त

Thane, Mumbai  -  

ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग 1 ने मुंब्रातल्या डायघर परिसरात असलेल्या मोठी देसाई खाडीच्या जवळ छापे टाकत 14 लाख रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे.

मुंब्रातल्या डायघर परिसरातील मोटी देसाई खाडीच्या जवळ असलेल्या दारूभट्टीवर अवैधरित्या देशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण यूनिट 1च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एक पथक तयार करून छापामारी केली.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जंगलच्या परिसरात देशी दारूने भरलेले मोठमोठे ड्रम ठेवण्यात आले होते. तेथून 14 लाख रुपयांची देशी दारू जप्त केली. यामध्ये अद्याप तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Loading Comments