कॉक्स अँड किंग्सचे CFO अनिल खंडेलवाला अटक

एचडीएफसी बँक, अॅक्सीस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक व खासगी गुंतवणूकदार कंपनी यांनी तक्रार केली आहे.

कॉक्स अँड किंग्सचे CFO अनिल खंडेलवाला अटक
SHARES

कॉक्स अँड किंग्सचा सीएफओ अनिल खंडेलवाल याचा ताबा आर्थिक गुन्हे शाखाने तुरुंगातून घेतला आहे. कर्ज चुकवेगिरीप्रकरणी त्याची चौकशी करण्यात येणार आहे. कॉक्स अँड किंग्स कर्ज चुकवेगिरीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने पाच गुन्हे दाखल केले असून त्यात १९५० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणातील मनी लाँडरिंगप्रकरणी सक्त वसुली संचलनालय(ईडी) तपास करत आहे.

हेही वाचाः- सर्वांसाठी लोकल पुढच्या वर्षातच? महापालिका आयुक्त म्हणाले...

खंडेलवालचा ताबा बुधवारी घेण्यात आला असून त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गुरूवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. आर्थिक व्यवहारांबाबतची महत्त्वपूर्ण माहिती त्याला असल्यामुळे याप्रकरणी त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिका-याने सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकिंग फसवणूक-२ कक्ष याप्रकरणी तपास करत आहे. याप्रकरणी भादंवि कलम ४०६,४०९, ४२०,४६५, ४६७, ४६८, ४७१ व १२०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्या पाच तक्रारीनुसार १९५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. कॉक्स अँड किंग्सचे पीटर केरकर यांच्याही तक्रारीवरून याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचीही तपासणी आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. यापूर्वी खंडेलवाल यांना मनी लाँडरींप्रकरणी ईडीने अटक केली होती. त्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा ताबा घेतला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा