Advertisement

सर्वांसाठी लोकल पुढच्या वर्षातच? महापालिका आयुक्त म्हणाले...

डिसेंबरच्या मध्यापर्यंत लोकल सेवा सर्वांसाठी खुली होईल, असा अंदाज करण्यात येत असला, तरी मुंबई महापालिका आयुक्तांच्या विधानामुळे ही सेवा थेट नव्या वर्षातच सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

सर्वांसाठी लोकल पुढच्या वर्षातच? महापालिका आयुक्त म्हणाले...
SHARES

राज्यातील विरोधी पक्षासहीत प्रवासी संघटनांकडून सातत्याने इशारा देऊनही मुंबईची (mumbai) लाइफलाइन असलेली उपनगरीय लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही. डिसेंबरच्या मध्यापर्यंत लोकल सेवा सर्वांसाठी खुली होईल, असा अंदाज करण्यात येत असला, तरी मुंबई महापालिका आयुक्तांच्या विधानामुळे ही सेवा थेट नव्या वर्षातच सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (bmc commissioner iqbal singh chahal) यांनी सध्या तरी सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू करणं योग्य नसल्याचं सांगितलं. थर्टी फर्स्ट निमित्तानेे पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामळे 31 डिसेंबर पर्यंत सर्वसामान्यांना लोकल ट्रेन मधून प्रवास करण्यास परवानगी नसेल. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून इतर सर्वसामान्य मुंबईकरांना अजून काही दिवस इतर पर्यायी साधनांनीच प्रवास करावा लागणार असल्याचं स्पष्ट आहे. 

गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी अशा एकापाठोपाठ आलेल्या सणांमुळे मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. परिणामी मुंबईत घसरलेली कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने प्रशासन चिंताग्रस्त झालं होतं. त्यातच जगभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याने काही देशांनी पुन्हा लाॅकडाऊन केलं. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात पुन्हा लाॅकडाऊन होईल का अशा चर्चा रंगायला लागल्या.

हेही वाचा- "प्रवाशांचा उद्रेक होण्यापूर्वी लोकलचे दरवाजे खुले करा"

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधत पुन्हा सर्वांना सावध केलं आणि घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. तसंच सर्व व्यवहार सुरूच राहतील, हे देखील स्पष्ट केलं. थंडीच्या महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सातत्याने जनतेला सतर्क ठेवलं. सद्यस्थितीत मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याने येत्या १५ डिसेंबरपासून सर्वसामान्यांनाही रेल्वे प्रवासाची मुभा मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली.  

त्यातच इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचा रस्तेमार्गे प्रवास दिवसेंदिवस अधिकच कष्टप्रद, खर्चिक होत आहे. कोट्यवधींचा खर्च करून ही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात महापालिका, बांधकाम विभाग या सरकारी यंत्रणा वारंवार अपयशी ठरत आहे. वाहतूक कोंडीही जैसे-थेच आहे. याचा आर्थिक फटका आणि मानसिक त्रास हा सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ९ महिन्यांपासून सर्वांसाठी बंद असलेल्या लोकलचे दरवाजे प्रवाशांचा उद्रेक होण्यापूर्वी खुले करावेत, अशी मागणी रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.

परंतु प्रशासनाच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (mumbai local train might open for all in January)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा