जोगेश्वरीत हार्बरचे काम सुरू असताना इमारतीवर क्रेन कोसळली


जोगेश्वरीत हार्बरचे काम सुरू असताना इमारतीवर क्रेन कोसळली
SHARES

जोगेश्वरी येथे हार्बर मार्गाच्या गोरेगाव पर्यंतच्या विस्ताराचे काम वेगाने सुरू आहे. मात्र हे काम सुरु असताना शनिवारी क्रेन अचानक बाजूला असलेल्या इमारतीवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी ही इमारत जुनी असल्याने या इमारतीला धोका निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हार्बरच्या विस्तारासाठी जोगेश्वरीचा फ्लॅटफॉर्म नंबर 1 देखील तोडण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेले काम आता अंतिम टप्प्यात आलं असून, लवकरच या प्रकल्पाचे काम देखील पूर्ण होणार आहे.

जोगेश्वरी स्टेशनला लागून असलेल्या या जमिनीवर एक हॉटेल असून, त्या हॉटेलचे स्थलांतर गरजेचे होते. अखेर यावर तोडगा काढण्यात आल्याने आता हे काम वेगाने सुरु आहे. सध्या रेल्वेरुळ टाकण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे प्लॅटफॉर्मचे काम झालं आहे. पण जोगेश्वरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा एक फाटक अजूनही पूर्णपणे बंद केलेलं नाही. त्यामुळे प्रवासी तिथूनच ये-जा करतात.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा