क्रेनची दुचाकीस्वारांना धडक, चालक अटकेत

 Mumbai
क्रेनची दुचाकीस्वारांना धडक, चालक अटकेत

मुंबई सेंट्रल - पट्टे बापुराव मार्गावर सिग्नलला उभ्या असलेल्या दुचाकींना गुरूवारी रात्री एका क्रेनने धडक दिली. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह एक दुचाकीस्वार जखमी झााला. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी शुक्रवारी क्रेन चालकाला अटक केली. मकसुद बरकत अली अन्सारी असं या क्रेन चालकाचे नाव आहे.

अपघातात पोलीस कर्मचारी दत्तात्रय साबळे आणि भावेश गांधी हे जखमी झाले आहेत. त्यांना किरकोळ मार लागला असल्याचे पोलिसांनी सांगितले. क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे क्रेन चालकाचे म्हणने आहे.

Loading Comments