मुंडणप्रकरणी शिवसेना शाखाप्रमुखावर गुन्हा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या राहुल उर्फ हिरामण तिवारी या तरुणाला सोमवारी वडाळा येथे शिवसैनिकांनी मारहाण केली होती.

मुंडणप्रकरणी शिवसेना शाखाप्रमुखावर गुन्हा
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या राहुल उर्फ हिरामण तिवारी या तरुणाला सोमवारी वडाळा येथे शिवसैनिकांनी मारहाण केली होती. याप्रकरणी शिवसेना शाखाप्रमुख आणि त्याच्या साथीदारांविरोधात वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. समाधान जुगदार, प्रकाश हंसबे, सत्यवान, श्रीकांत यादव अशी या चौघांची नावे आहेत. 

नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर वडाळा येथील राहुल उर्फ हिरामण तिवारी याने फेसबुकवर पोस्ट लिहून टीका केली. त्यामुळे शाखाप्रमुख समाधान जुगदर आणि प्रकाश हसबे यांनी तिवारी याला मारहाण करत त्याचं मुंडण केलं होतं.

तिवारी याचं मुंडण करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरला झाला होता. त्यामुळे तिवारी यांनी पोलिसांकडं तक्रार नोंदवली. पोलिसांनी तेव्हा अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता.  मात्र या प्रकरणात दखलपात्र गुन्हा नोंदवावा, आरोपींना अटक  करावी या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार तामिळ सेलवन यांनी बुधवारी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी शाखाप्रमुख समाधान जुगदर आणि प्रकाश हसबे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. 



हेही वाचा - 

पुन्हा रॅगिंगची तक्रार

...म्हणून बेस्टला सहन करावा लागतोय आर्थिक तोटा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा