मंजुला शेट्ये मृत्यू प्रकरण, एकाला अटक


मंजुला शेट्ये मृत्यू प्रकरण, एकाला अटक
SHARES

भायखळ्यातील महिला कारागृहातील कैदी मंजुला शेट्ये हिच्या मृत्यू प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) ने शनिवारी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली महिला ही कारागृहातील सुरक्षा रक्षक असून बिंदू निकाडे असे तिचे नाव आहे.


7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा

अटक करण्यात आलेल्या बिंदू निकाडे या महिलेला न्यायालयात हजर केले असता, तिला 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुरुंग अधिक्षकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर देखील अटकेची टांगती तलवार आहे. 


मंजुला शेट्ये हत्याप्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचला देत, याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली. त्यानंतर अवघ्या 48 तासांत पहिली अटक करण्यात आली आहे. अटक करण्यापूर्वी बिंदू निकाडे या सुरक्षा रक्षकाला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. 


त्यानंतर तिची चौकशी करून अटक करण्यात आली. अद्याप या प्रकरणी पाच आरोपी मोकाट असून त्यात जेल अधिक्षक मनीषा पोखरकर यांचा देखील समावेश आहे. उर्वरित पाच आरोपींना कधी अटक करणार याबाबत मात्र क्राइम ब्रँच गप्प आहे.



हे देखील वाचा - 

मंजुलावर तुरुंगात लैंगिक अत्याचार - इंद्राणी

'मंजुला शेट्येवर लैंगिक अत्याचार झालाच नाही'




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा