मंजुलावर तुरुंगात लैंगिक अत्याचार - इंद्राणी


मंजुलावर तुरुंगात लैंगिक अत्याचार - इंद्राणी
SHARES

भायखळा कारागृहातील मृत महिला कैदी मंजुला शेट्येवर 'निर्भया'सारखेच पाशवी लैंगिक अत्याचार झाल्याचे इंद्राणी मुखर्जीने सीबीआय न्यायालयासमोर सांगितले. 


लाठीहल्ल्यात पुरुष कर्मचारी

मंजुला शेट्येच्या मृत्यूनंतर भायखळा कारागृहात महिला कैद्यांची उठाव केल्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप इंद्राणीने केला होता. या लाठीहल्ल्यात पुरुष कर्मचारीही असल्याचे यावेळी इंद्राणीने न्यायालयाला सांगितले.


वैद्यकीय चाचणीत आढळल्या जखमा

या प्रकरणी अमानुषपणे मारहाण झाल्याने आपल्याला पोलिसांविरोधात तक्रार द्यायची असल्याचे इंद्राणीच्या वकिलांनी न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार बुधवारी इंद्राणीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाला तुरूंग प्रशासनाविरोधातील गाऱ्हाणे इंद्राणीने ऐकवले. तिचे म्हणणे एेकूण घेतल्यानंतर न्यायालयाने इंद्राणीची वैद्यकीय चाचणी करण्याचेही आदेश तुरुंग प्रशासनाला दिले. 

त्यानुसार इंद्राणी मुखर्जीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. नुकत्याच समोर आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार इंद्राणीच्या शरीरावर आणि हातावर जखमा आढळून आल्या आहेत.


न्यायालयात काय म्हणाली इंद्राणी?

मंजुलाच्या गुप्तांगात रॉड घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार
तिच्या मृत्यप्रकरणी साक्षीदार न होण्यासाठी दबाव
जेल कर्मचाऱ्यांकडून काठीने मारहाण
मंजुलासारखीच गत करण्याची धमकी
न्यायालयाला दाखवल्या जखमा


कशामुळे झाला कारागृहात उठाव?

भायखळा महिला कारागृहात हत्येच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेली मंजुला शेट्ये हिला कारागृहातील कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. वॉर्डनची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या मंजुलाला दोन अंडी आणि पाच पाव कमी पडल्यामुळे ही मारहाण करण्यात आली.

त्यानंतर 23 जूनला तुरुंग अधिक्षकांसमवेत इतर महिला गार्डनी मंजुलावर पाशवी लैंगिक अत्याचार केले. तिचे दोन्ही पाय पकडून तिच्या गुप्तांगात काठी घालण्यात आली. त्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने मंजुला बेशुद्ध झाली.

तिला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे तिचा मृत्यू झाला. हे समजताच भायखळा कारागृहातील महिला कैद्यांची उठाव केला. यादरम्यान महिला कैद्यांनी कारागृहात आग लावण्याचा प्रयत्न केला.

त्याचप्रमाणे काही कैद्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. यांत इंद्राणीसह 200 महिला कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे प्रकरण समोर आल्यावर मंजुलाच्या हत्येप्रकरणी तुरूंग अधिक्षक मनिषा पोखरकारसह अन्य पाच महिला गार्ड विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन या सगळ्यांना निलंबित करण्यात आले. सध्या या हत्येचा गुन्हे शाखा तपास करत असून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे.



हे देखील वाचा -

महिला कैद्याचा मृत्यू : 6 जणांवर हत्येचा गुन्हा


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा