आमदार रमेश कदमची पोलिसांना शिवगाळ करतानाचा व्हिडिओ वायरल

  मुंबई  -  

  गेल्या कित्येक महिन्यांपासून अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी जेलची हवा खात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम याची मुजोरी अद्यापही कायमच आहे. सध्या या रमेश कदमचा एक व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात रमेश कदम एका पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करताना दिसत आहे. व्हिडियोमध्ये रमेश कदमने सहाय्यक पोलीस निरीक्षकानां हक्कभंगाची धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.


  रमेश कदम याने सहाय्यक पोलीस निरीक्षकाला केलेल्या शिवीगाळीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी एक चौकशी समिती स्थापन करून कदम याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

  - रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त आणि प्रवक्त्या

  काही दिवसांपूर्वी गुढग्याचा त्रास असल्याचे सांगितल्याने उपचारासाठी त्याला जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. गुरुवारी त्याचाच रिपोर्ट आणण्यासाठी सकाळी रमेश कदमला जे. जे. रुग्णालयात नेण्यासाठी भायखळा कारागृहातून बाहेर काढण्यात आले. रमेश कदम आणि त्याला घेऊन जाणारे पोलीस व्हॅनच्या प्रतीक्षेत असताना काही कारणावरून रमेश कदम नाराज झाला. सोबतच्या अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिव्या घालू लागला. व्हिडिओत दिसणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव (एपीआय) मनोज पवार असून त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात या विषयी वरिष्ठांना कळवल्याचे समजते. या व्हिडिओत सुरुवातीला रमेश कदमने एपीआय मनोज पवारला शिव्या घातल्या त्यानंतर मनोज पवार यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप देखील केला आहे. पण आपले चित्रीकरण केले जात असल्याचे त्याला कळल्यानंतर तो शांत झाला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.