सव्वा लाख बेकादेशरीर मास्कचा साठा जप्त


सव्वा लाख बेकादेशरीर मास्कचा साठा जप्त
SHARES

देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामध्ये मुंबईचा अव्वल क्रमांक आहे. सरकार पातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. देशभरात जमाव बंदीसह लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना मास्कच्या वापर करण्याबरोबरच हात सॅनिटायझरने धुण्याचा सूचना दिल्या जात आहे. परिणामी या दोन्ही वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. याचाच काहीजण गैरफायदा घेताना दिसत आहेत.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 मार्च रोजीच्या अधिसूचनेप्रमाणे मास्क व हॅन्ड सॅनिटायझर यांची किंमतदेखील नमूद केली आहे. या वस्तूंचा काळाबाजार होणार नाही तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत प्रशासनाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र असे असूनही मुंबईतील नागपाडा येथील मदनपुरा परिसरात आकीब मोहम्मद कासिम अन्सारी हा युवक कोणताही अधिकृत परवाना किंवा कागदपत्र नसताना जास्त दराने मास्कची करत होता.

 शिवाय त्याने तीन प्लाय सर्जिकल मास्कचा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या साठा देखील करून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती. या वरून संबंधित ठिकाणी छापा मारून 30 लाख 52 हजार 500 रुपये एकूण किंमत असलेल्या तब्बल 1 लाख 22 हजार 100 मास्कचा साठा जप्त करण्यात आला व या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
संबंधित विषय