चेंबूरमध्ये कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत चालली आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत महापालिकेनं नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.

चेंबूरमध्ये कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत चालली आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत महापालिकेनं नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास देखील महापालिकेनं सुरुवात केली आहे. त्यानुसार चेंबूर परिसरात कोरोनाची लागण झालेला एक रुग्ण घराबाहेर फिरत होता. याबाबत माहिती मिळताच या रुग्णाविरोधात गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

चेंबूरच्या अतुर पार्क या उच्चभ्रू परिसरात हा रुग्ण पत्नी आणि मुलीसह राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. २ दिवसांपूर्वी आलेल्या अहवालात दोघा पती-पत्नीला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांना गंभीर लक्षणं नसल्यानं महापालिकेनं घरातच त्यांच्यावर उपचार सुरू केले.

मात्र, महापालिका कर्मचाऱ्यांना आरोपी आणि त्यांचे कुटुंबीय सहकार्य करत नव्हते. याच दरम्यान कोरोनाची लागण झालेला व्यक्ती बाहेर फिरत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पालिका अधिकाऱ्यांनी खात्री करून घेतल्यानंतर संबंधिताविरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रात दाखल केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा