मुख्याध्यापकाचा शिक्षिकेवर बलात्कार

शैक्षणिक काळात सहा वर्षे मुख्याध्यापकानं तिचा वारंवार विनयभंग केला होता. शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर तिला कामानिमित्त घरी बोलावून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

मुख्याध्यापकाचा शिक्षिकेवर बलात्कार
SHARES

मुंबईच्या वांद्रे परिसरातील एका प्रसिद्ध शाळेच्या मुख्याध्यापकानं शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेवरच बलात्कार केल्याची संपातजनक बाब उघडकीस आली आहे. पीडित शिक्षिकेनं या सर्व प्रकाराचे छुप्या पद्धतीनं चित्रीकरण केलं आहे. याप्रकरणी पीडित तरुणीनं संबधित मुख्याध्यापका विरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात  तक्रार नोंदवली आहे. तिच्या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.


मुख्य्यापकाचे शिक्षिकेसोबत गैरवर्तन

वांद्रे परिसरात राहणाऱ्या त्या पीडित शिक्षिकेचे शिक्षण हे त्याच महाविद्यालयात पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्याच शाळेत ती शिक्षिका जुलै २०१७ पासून अंशकालीन शिक्षिकेचं काम करत होती. शैक्षणिक काळात सहा वर्ष या मुख्याध्यापकानं तिचा वारंवार विनयभंग केला होता. शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर तिला कामानिमित्त तो घरी बोलावायचा. भावांना शाळेतून काढण्याची धमकी देत त्यानं बलात्कार केल्याचा आरोपी पीडितेनं तक्रारीत केला आहे. मात्र रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं याबाबत शाळेतील वरिष्ठ शिक्षिकांच्या कानावर हा प्रकार घातला. मात्र त्याही तिच्याबाजूनं उभ्या राहिल्या नाहीत.


स्पाय कॅमेऱ्यानं केला पर्दाफाश

त्रासलेल्या पीडित शिक्षिकेनं हीबाब तिच्या मैत्रिणीला सांगितली. तिच्या मैत्रिणीनं तिच्या वडिलांची मदत घेतली. त्यावेळी त्यांनी पुराव्या शिवाय कोणही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे या गैरवर्तवणुकीचं छुप्या कॅमेऱ्यानं चित्रीकरण करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पीडितेला मुख्यध्यापकानं पून्हा एकदा घरी बोलवलं होतं. त्यावेळी पीडितेनं मुख्यध्यापक करत असलेल्या गैरवर्तवणूकीचं चित्रीकरण केलं. त्यानंतर ही शिक्षिकेला ही बाब शाळा प्रशासनाच्या कानावर घालण्यापासून अनेकांनी रोखल्याचं तिनं तक्रारीत म्हटंलं आहे. मात्र त्यांना न जुमानता पीडित शिक्षिकेनं खेरवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा

कंपनीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा अकाउन्टंट अटकेत

फसवणुकीच्या पैशातून निर्माती प्रेरणा अरोराची उधळपट्टी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा