कंपनीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा अकाउन्टंट अटकेत

दिनेश पांड्यानं २०१२ पासून ते २०१९ पर्यंत कंपनीला १ कोटी ९८ लाखांना गंडवलं असल्याचं तपासात पुढे आलं आहे.

SHARE

शिवडीतील एका खासगी कंपनीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या अकाउन्टंटला शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश पांड्या (४२) असं या आरोपीचं नाव आहे. पांड्यानं २०१२ पासून ते २०१९ पर्यंत कंपनीला १ कोटी ९८ लाखांना गंडवलं असल्याचं तपासात पुढे आलं आहे. या पैशातून त्यानं घर, पत्नीला मौल्यवान दागिने घेतल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.

शिवडी रेल्वे स्थानकाजवळील एका खासगी कंपनीत पांड्या हा २०११ मध्ये अकाउन्टंट म्हणून कामाला राहिला होता. या कंपनीतील सर्व व्यवहार पांड्याच्या निदर्शनाखाली व्हायच्या. याचाच फायदा घेत पांड्यानं व्यवहारातील पैसे ट्प्याटप्यानं स्वतःच्या खात्यावर वळवण्यास सुरूवात केली. सन २०१२ आणि २०१३ वर्षात पांड्यानं पहिल्यांदा टप्याटप्याने १० लाख ८५ हजार ५३० रुपये स्वतःच्या खात्यावर वळवले.

त्यानंतर २०१३-२०१४ मध्ये २३ लाख ९४ हजार, २०१५-२०१६ मध्ये  ३७ लाख ९५ हजार, २०१६-२०१७ मध्ये २९ लाख ८६ हजार आणि २०१७-२०१८ मध्ये ३२ लाख टप्याटप्यानं वळवले. तसंच २०१८-२०१९ मध्ये पांड्यानं ७ लाख ८३ हजार खात्यावर वळवले होते. तो स्वतःच्या कंपनीची सर्व खाती हाताळात असल्यामुळे पैशांची सर्व अफरातफर तो अगदी अलगद हाताळात होता.

दरम्यान नोव्हेंबर २०१८ मध्ये पांड्या काही कामानिमित्त सुट्टीवर गेला होता. मात्र सुट्टीवर जाण्यापूर्वी त्याने १ लाख रुपयांचं ट्रान्जेक्शन स्वतःच्या खात्यावर केलं होतं. सुट्टीवर गेल्यानंतर पांड्याचा सहकाऱ्याला हिशोबात तफावत आढळून आल्यानं त्यानं ही बाब कंपनीच्या मालकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार पुढे आला. याप्रकरणी कंपनीतर्फे हर्शद पोपट यांनी शिवडी पोलिसात तक्रार नोंदवली. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना हर्शदनं फसवणुकीतल्या रक्कमेतून बदलापूर इथं घर, पत्नीसाठी 24 तोळं सोनं खरेदी केलं आहेत.

हे घर आणि सोनं त्यानं गहाण ठेवून त्यावर साडे दहा लाख रुपये उधारीवर घेतलं आहे. तसंच काही रक्कम त्यानं आपल्या पत्नीच्या खात्यावर ही वळवली आहे. तसंच फसवणुकीच्या पैशातून एक गाडी आणि इंदोर आणि अहमदनगर इथंही फ्लॅट खरेदी केल्याचं पुढे आलं आहे. दरम्यान शिवडी पोलिसांनी पांड्याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  हेही वाचा

1993 च्या स्फोटातील मुख्य आरोपी अबू बकरला दुबईत अटक

औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर एफडीएची कारवाईसंबंधित विषय
ताज्या बातम्या