औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर एफडीएची कारवाई

संरक्षण विभागाची औषधे काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व ओषध प्रशासन विभाग(एफडीए)ने मुंबईसह नवी मुंबईत तीन कारवाया केल्या आहेत. या कारवाईत एफडीएने तब्बल 40 लाखांचा औषध साठा जप्त केला आहे.

SHARE

संरक्षण विभागाची औषधं काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व ओषध प्रशासन विभाग(एफडीए)नं मुंबईसह नवी मुंबईत तीन कारवाया केल्या आहेत. या कारवाईत एफडीएनं तब्बल 40 लाखांचा औषधसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी एफडीएनं मुलुंड, भायखळा आणि तळोजा पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

         

भायखळा-मुलुंडमध्ये एफडीएची कारवाई

मुंबईच्या भायखळा परिसरातील मे. निवान फार्मास्टुटीकल्स तर्फे खाडाखोड केलेल्या औषधांची विक्री होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. ही औषधं शासकिय रुग्णालय किंवा संस्थेला पुरवली जातात. मिळालेल्या माहितीनुसार एफडीएनं ३० जानेवारी रोजी मे. निवान फार्मास्टुटीकल्स कंपनीवर कारवाई करत, १३ लाखांचा औषधसाठा जप्त केला. तसंच या औषधांचा साठा मे. निवास फार्मास्टुटीकल्सनं मुलुंड इथल्या मे. मेडलाईफ एंटरप्राइझेस प्रा. लि. कंपनीला पुरवल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर एफडीएनं मुलुंडच्या मे. मेडलाईफ एंटरप्राझेस प्रा. लि. कंपनीकडून १७ लाखांचा औषधांचा साठा हस्तगत केला.  

सात जणांवर गुन्हा दाखल

तपासात भायखळातील मे. निवान फार्मास्टुटीकल्स कंपनीला हा औषधसाठा सानपाडा येथील श्री समर्थ डिस्ट्रीब्युटर्स ने पाठवल्याचं उघड झालं. तसंच काही औषधं ही परदेशातून आयात करण्यात आली होती. याप्रकरणात भिवंडीतील मे. एस. के. लॉजिस्टीक्स या कंपनीचं नाव ही पुढे आलं. या कंपनीत औषधांवरील नावं खोडण्यात आली होती.

त्यानुसार एफडीएनं मुलुंड इथल्या सेफलाइफ एन्टरप्रायझेसचे संचालक दीपेश ताराचंद गाला, ध्रुव दिलीप मेहता यांच्यासह भायखळ्यातील निवान फार्मास्युटिकल्सचे मालक विनिताल निक्षित लुनिया आणि निक्षित लुनिया यांच्यासह मेडलाइफ या ऑनलाइन औषधविक्रेत्या कंपनीचा संचालक प्रशांत सिंग, तुषार कुमार, सौरभ अग्रवालसह  अन्य काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ‘एफडीए’च्या अंदाजानुसार, दिल्ली आणि मध्य प्रदेशातून या औषधांचा पुरवठा झाला आहे. पश्‍चिम बंगालमधूनही औषधांचासाठा आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.हेही वाचा

फसवणुकीच्या पैशातून निर्माती प्रेरणा अरोराची उधळपट्टी

वाहतूक कोंडी आणि टोल वाचवण्यासाठी बनला तोतया कस्टम अधिकारीसंबंधित विषय
ताज्या बातम्या