अबब, पोलिसाची संपत्ती पगाराच्या 882 पट!

 Pali Hill
अबब, पोलिसाची संपत्ती पगाराच्या 882 पट!

मुंबई -  उत्पन्नाच्या 882 टक्के मालमत्ता जमावल्याबद्दल पोलीस हवालदार नितीन गायकवाडच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विभागाने नितीनसोबत त्याची पत्नी मनीषाला देखील आरोपी बनवले आहे.

नितीन सध्या म्हाडाचा फ्लॅट देण्याच्या नावाखाली ४७ लाखांची फसवणुकीप्रकरणी आर्थर रॉड मध्ये बंद आहे. नितीन हा मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागात सेवेत होता. तसेच तो मागील काही वर्षे माजी मंत्री सचिन अहिरांचा पोलीस सुरक्षा रक्षक होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गेल्या दोन वर्षांपासून नितीनच्या मालमत्तेची चौकशी करत आहे. आत्तापर्यतच्या चौकशीत 1 जानेवारी 2008 ते 30 नोव्हेंबर 2014 दरम्यान नितीनने तब्बल 2 कोटी 77 लाखांची मालमत्ता जमावल्याचे समोर आले आहे.

Loading Comments