कंबाला रुग्णालयातील कामगारांची निदर्शनं

 Grant Road
कंबाला रुग्णालयातील कामगारांची निदर्शनं
कंबाला रुग्णालयातील कामगारांची निदर्शनं
See all

ग्रँट रोड - कंबाला हिल रुग्णालयातील कामगारांनी रुग्णालयाच्या आवारातच निदर्शनं केली. गेल्या चार महिन्यांपासून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाहिये. तसंच 2014 मध्ये सेवा निवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅज्युटी दिली नाहिये. त्यामुळे मनसे कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. मनसे कामगार सेना उपाध्यक्ष राकेश तारापुरकर, चिटणीस केतन नाईक, राज पारटे, विचारे कुरीयर कामगार युनिट सरचिटणिस रवी जाधव, सचिन भोसले आदी आंदोलनाला उपस्थित होते.

रुग्णालयाचे ट्रस्टी विजय शेट्टी यांची या समस्येसंबंधी भेट घेण्यात आलीय. येत्या दोन आठवड्यात कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात यावेत अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गजानन राणे यांनी दिलाय.

Loading Comments